शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक मुलींचा निवासाचा प्रश्न सुटला!

By admin | Updated: August 19, 2014 23:32 IST

परिसरातील शैक्षणिक हबचा विचार करता या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी शासनाने पनवेलमध्ये खास वसतिगृह उभारले आहे.

पनवेल : परिसरातील  शैक्षणिक हबचा विचार करता या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक  विद्यार्थिनींसाठी शासनाने पनवेलमध्ये खास वसतिगृह उभारले आहे. सर्व सोयी सुविधायुक्त असलेल्या या वास्तूचे अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री नसीम खान यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. 
उच्च शिक्षणासाठी  बाहेरून  हजारो विद्यार्थी  शहरात येतात  त्यामध्ये मुलींचे प्रमाणही ब:यापैकी असते. त्यात अल्पसंख्याक विद्यार्थिनींचे प्रमाण कमी असते याचे कारण म्हणजे राहण्याची सोय, त्याचबरोबर सुरक्षितता या सर्व अडचणी  त्यांच्यासमोर येतात. परिणामी पालक मुलींना गुणवत्ता असूनही बाहेर पाठवत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करून  प्रत्येक जिल्हय़ात  अल्पसंख्याक मुलींसाठी राहण्याची सोय असावी अशी शिफारस सच्चर आयोगाने केली होती. त्यानुसार कोल्हापूर आणि चंद्रपूर या ठिकाणी वसतिगृह उभारण्यात आले आहे. 
रायगड जिल्हय़ातील मध्यवर्ती ठिकाणी ही इमारत उभारण्याचा निर्णय अल्पसंख्याक विभागाने घेतला होता. मात्र पनवेल हे शैक्षणिक हब म्हणून  विकसित होत असून या ठिकाणी अनेक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे या  परिसरात वसतिगृह उभारण्याचा आग्रह आ. प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे धरला होता. त्यांची मागणी रास्त असल्याचे पाहून आम्ही या परिसरात अत्याधुनिक वसतिगृह उभारले असल्याचे नसीम खान यांनी सांगितले. या वसतिगृहात त्वरित प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही खान यांनी दिले. अल्पसंख्याकांसाठी  सर्वाधिक योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील नंबर एकचे राज्य असल्याचेही ते म्हणाले. पनवेल परिसरात मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत. या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक विद्यार्थिनींना या वसतिगृहाचा फायदा होईल असे मत आ. प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कामगार नेते महेंद्र घरत, नगराध्यक्षा चारूशीला घरत, प्रांताधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार पवन चांडक यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)
 
पाच कोटींचा प्रकल्प : शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या आवारात चार मजली इमारत उभारण्यात आली आहे. यामध्ये 1क्8 मुलींची क्षमता असून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रकल्प पूर्ण केले आहे. याकरिता बांधकाम क्षेत्रतील नामांकित एजन्सीची नियुक्त करण्यात आली होती. 4 कोटी 97 लाख 8क्3 रूपये या प्रकल्पासाठी खर्ची पडले असल्याचे सा.बां. विभागाच्या अधिका:यांनी सांगितले. तळमजल्यावर प्रतीक्षा कक्ष आणि अपंग विद्यार्थिनींसाठी व्यवस्था आहे.पहिल्या माळयावर कार्यालय, संगणक कक्ष, गृहपाल निवास, स्वयंपाकगृह, भांडार, भोजन कक्ष आणि मनोरंजन दालनाचा समावेश आहे.तिस:या आणि चौथ्या मजल्यावर एकूण 32 रूम असून त्या ठिकाणी विद्यार्थिनींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीत इंटेरिअर करण्यात आले असून टेबल, खुच्र्या आणि पलंग ठेवण्यात आले आहेत. 
 
खुल्या वर्गासाठी तीस टक्के जागा 
अल्पसंख्याक विभागासाठी उभारण्यात आलेल्या या हायटेक वसतिगृहात मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, पारसी आणि नवबौध्द समाजातील मुलींकरिता 7क् टक्के जागा राखीव आहेत. त्याचबरोबर खुल्या वर्गातील 3क् टक्के मुलींना या वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.