शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आयपीसीसी परीक्षेला बसणा-यांना दिलासा

By admin | Updated: September 24, 2014 04:56 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या टीवायच्या प्रमुख परीक्षा ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने जाहीर केला होता

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या टीवायच्या प्रमुख परीक्षा ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने जाहीर केला होता. याच कालावधीत चार्टड अ‍ॅकाउंटंट आणि आयपीसीसीची परीक्षा आल्याने टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. याची दखल घेत विद्यापीठाने या परीक्षांच्या कालावधीत टीवायबीकॉमची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.विधानसभा निवडणूक कार्यक्रमाचा फटका मुंबई विद्यापीठाच्या आॅक्टोबर परीक्षेला बसला होता. त्यामुळे विद्यापीठाने टीवायबीकॉम, बीए आणि बीएससी या परीक्षा ५ नोव्हेंबरपासून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याच कालावधीत टीवायबीकॉमच्या काही विद्यार्थ्यांचे पेपर हे आयपीसीसी आणि चॅटर्ड अकाउंटंटच्या परीक्षेच्या एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संम्रभाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी विद्वत परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या परीक्षेच्या दिवशी विद्यापीठाच्या टीवायबीकॉमच्या परीक्षा घेऊ नयेत, अशा सूचना परिषदेने परीक्षा नियंत्रकांना दिल्या आहेत. त्यामुळे आयपीसीसी आणि चार्टड अकाउंटंट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.टीवायबीकॉमचे सुधारित वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)