हिंदुराष्ट्र सेनेवर बंदी आणण्याचा ठराव

By Admin | Updated: June 17, 2014 03:50 IST2014-06-17T03:50:04+5:302014-06-17T03:50:04+5:30

पुणे येथील मोहसीन शेख हत्येचा निषेध करीत हिंदुराष्ट्र सेनेवर बंदी घालावी, असा ठराव राज्यव्यापी धिक्कार परिषदेत केला़

Resolution to bring ban on Hindu Rashtra Sena | हिंदुराष्ट्र सेनेवर बंदी आणण्याचा ठराव

हिंदुराष्ट्र सेनेवर बंदी आणण्याचा ठराव

अहमदनगर : पुणे येथील मोहसीन शेख हत्येचा निषेध करीत हिंदुराष्ट्र सेनेवर बंदी घालावी, असा ठराव राज्यव्यापी धिक्कार परिषदेत केला़ जातीयवाद्यांचे आक्रमण रोखण्यासाठी दलितांनी वैचारिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन या वेळी केले़
सहकार सभागृहात राज्यव्यापी अत्याचारविरोधी धिक्कार परिषद सोमवारी घेण्यात आली़ परिषदेत दलित, मुस्लीम समाजावरील अत्याचारविरोधात वैचारिक लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ पानसरे म्हणाले, जातीयवाद्यांनी क्रिया करायची आणि त्यावर आपण प्रतिक्रिया द्यायची, हे आता थांबले पाहिजे़ सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे पानसरे या वेळी म्हणाले़ दलित व मुस्लीम समाजातील युवक सैरभैर झाले आहेत़ येणाऱ्या पिढीचा विचार आपण केला पाहिजे़ आता रडायचे थांबवा आणि अत्याचारास जशास तसे उत्तर द्या, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केले़ मुस्लिमांवरील अत्याचार वाढत आहेत़ हे एक संकट आहे़ या संकटाविरोधात एकट्याने लढून फायदा नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे झहीर अली या वेळी म्हणाले़ हिंदुराष्ट्रसेनेवर बंदी घालण्याचा ठराव परिषदेत केला़ (प्रतिनिधी)

Web Title: Resolution to bring ban on Hindu Rashtra Sena