शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विधानसभेच्या 'या' ८ आमदारांचा राजीनामा; सभागृहात अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 13:57 IST

लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला.

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजीनामा दिलेल्या आमदारांची नावे वाचून दाखवली. या आमदारांचे राजीनामा स्वीकारल्याची माहिती नार्वेकर यांनी सभागृहाला दिली. 

विधानसभा सकाळी ११ वाजता सुरु होताच राष्ट्रगीत, राज्यगीतानंतर प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळी अध्यक्षांनी विधानसभा सदस्यांच्या सदस्यत्वपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा नियम ९९ (२) च्या तरतुदींना अनुसुरून सभागृहाला कळवतो, खालील विधानसभा सदस्यांनी दिलेला राजीनामा मी पुढील दिनांकापासून स्वीकारला आहे असं त्यांनी सांगितले.  

राजू पारवे, काँग्रेस आमदार  राजीनामा स्वीकारल्याची तारीख - २४ मार्च २०२४ 

निलेश लंके, राष्ट्रवादी आमदार राजीनामा स्वीकारल्याची तारीख - १० एप्रिल २०२४

प्रणिती शिंदे, काँग्रेस आमदारराजीनामा स्वीकारल्याची तारीख - १० जून २०२४

बळवंत वानखेडे, काँग्रेस आमदारराजीनामा स्वीकारल्याची तारीख - १२ जून २०२४

प्रतिभा धानोरकर, काँग्रेस आमदारराजीनामा स्वीकारल्याची तारीख - १३ जून २०२४

संदीपान भुमरे, शिवसेना आमदार राजीनामा स्वीकारल्याची तारीख - १४ जून २०२४

रवींद्र वायकर, शिवसेना आमदारराजीनामा स्वीकारल्याची तारीख - १४ जून २०२४

वर्षा गायकवाड, काँग्रेस आमदार राजीनामा स्वीकारल्याची तारीख - १८ जून २०२४

वरील सदस्यांपैकी राजू पारवे वगळता सर्व सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. नियमानुसार त्यांना दोन्ही पैकी एक पद ठेवता येते. त्यानुसार या आमदारांनी लोकसभा सदस्यत्वाचं पद ठेवत आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे हे रामटेकमधून शिवसेना महायुतीचे उमेदवार होते. त्यांचा काँग्रेस उमेदवाराने पराभव केला. तर निलेश लंके यांनी अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंचा पराभव करून दिल्ली गाठली आहे. प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधून राम सातपुते या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव केला. बळवंत वानखेडे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यांनी भाजपाच्या नवनीत राणा यांचा पराभव केला. 

तसेच प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाची धूळ चारून दिल्ली गाठली. संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केला. भुमरे यांनी चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील यांचा पराभव केला. रवींद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विजयी झाले. त्यांनी उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. तर वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्यमधून विजय मिळवला. भाजपाचे उज्ज्वल निकम यांचा पराभव वर्षा गायकवाडांनी केला.  

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRahul Narvekarराहुल नार्वेकरPraniti Shindeप्रणिती शिंदेSandipan Bhumreसंदीपान भुमरेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालnilesh lankeनिलेश लंके