शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बढत्यांमधील आरक्षण रद्द

By admin | Updated: December 2, 2014 04:48 IST

सरकारी, निमसरकारी आस्थापने व अनुदानित संस्थांमध्ये सर्व स्तरांपर्यंतच्या बढत्यांमध्ये मागासवर्गीय समाजासाठी ५२ टक्के पदे आरक्षित ठेवण्याचा राज्य सरकारने १० वर्षांपूर्वी केलेला कायदा

अजित गोगटे, मुंबईसरकारी, निमसरकारी आस्थापने व अनुदानित संस्थांमध्ये सर्व स्तरांपर्यंतच्या बढत्यांमध्ये मागासवर्गीय समाजासाठी ५२ टक्के पदे आरक्षित ठेवण्याचा राज्य सरकारने १० वर्षांपूर्वी केलेला कायदा आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काढलेला शासन निर्णय (जीआर) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) घटनाबाह्य ठरवून रद्द केला आहे. सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये मराठा व मुस्लिमांना ठेवलेल्या आरक्षणास उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करीत असतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला हा दुसरा दणका मिळाला आहे.आरक्षणाचा हा कायदा विधिमंडळाने २००४ मध्ये मंजूर केला होता व त्याच वर्षी २५ मे रोजी काढलेल्या ‘जीआर’ने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली गेली होती. त्याविरोधात केलेल्या विविध याचिकांवर ‘मॅट’चे उपाध्यक्ष राजीव अगरवाल व न्यायिक सदस्य आर. बी. मलिक यांच्या खंडपीठाने गेल्या शुक्रवारी यासंबंधी  दिलेले १७५ पानी निकालपत्र सोमवारी उपलब्ध झाले.कोणी केल्या होत्या याचिका सर्वश्री विजय घोगरे, बापुसाहेब रंगनाथ पवार शिवाजी मारुती उपासे (सर्व पुणे), हनमंत व्ही. गुणाले आणि राजन आर. शहा (सातारा) या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातील तसेच राजेंद्र रामचंद्र पवार (ठाणे)या कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील ज्येष्ठ अभियंत्यांनी केलल्या याचिका मंजूर करून हा निकाल दिला गेला. खरे तर संदर्भित कायदा व ‘जीआर’ लागू झाल्यावर लगेगच हा याचिका उच्च न्यायालयात केल्या गेल्या होत्या व त्यानुसार दिल्या जाणाऱ्या बढत्या याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून दिल्याचे मानले जाईल, असा अंतरिम आदेशही उच्च न्यायालयाने दिला होता. यंदाच्या १२ मार्च रोजी उच्च न्यायालयाने या याचिका अंतिम निवाड्यासाठी ‘मॅट’कडे वर्ग केल्या होत्या.