शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

Remdesivir Injection : राज्यात दिवसाला ५० हजार रेमडेसिविरची गरज; ७० टक्के पुरवठा महाराष्ट्राला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 01:17 IST

Remdesivir Injection : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच रेमडेसिविर उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीप्रमाणे कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा राज्याला केला जात आहे.

मुंबई : राज्यात दररोज ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असून, तेवढ्या इंजेक्शनचा पुरवठा होत आहे, तर मुंबईत सध्या दिवसाला तीन ते अडीच हजार रेमडेसिविर व्हायल्सची गरज भासत आहे,  पालिका रेमडेसिविर खरेदीसाठी कोणत्याही अन्य यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतः खरेदी करत आहे. पालिकेच्या या पूर्वनियाेजनामुळे पालिका रुग्णालयात रेमडेसिविरचा कधीच तुटवडा भासत नाही, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाने दिली आहे.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच रेमडेसिविर उत्पादकांसोबत झालेल्या बैठकीप्रमाणे कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा राज्याला केला जात आहे. टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, सध्याची काेराेनाची वाढती रुग्णसंख्या पाहता एप्रिलअखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करण्याचे सुचविले आहे.तर राज्यात कुठेही १,४०० रुपये या किमतीतच रेमडेसिविर मिळाले पाहिजे, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रेमडेसिविरचे उत्पादन १५ दिवसांत दुप्पट होणार असल्याचेही ते म्हणाले.

इंजेक्शन मिळविणे झाले अवघडइंजेक्शन खरेदीसाठी आधारकार्ड, प्रिस्क्रिप्शन सक्तीचे केल्याने हे इंजेक्शन मिळविताना नाकीनऊ येत आहेत, अशी अपेक्षा आहे, असे रुग्णाचे नातेवाईक वंदना आशापुरा यांनी सांगितले.

प्रिस्क्रिप्शन न देता मागणीमुलुंड येथील खासगी रुग्णालयाने विनाप्रिस्किप्शन रेमडेसिविर घेऊन येण्यास सांगितले. मात्र, कुणीच ते दिले नाही. एफडीएने प्रिस्क्रिप्शनची सक्ती केल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने चिठ्ठी दिली. त्यामुळे आठ तासांनंतर इंजेक्शन मिळाले, असे रुग्णाचे नातेवाईक दयावंत भोसकर म्हणाले.

मागील काही काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने सरकारने कंपन्यांना उत्पादन कमी करण्याचे निर्देश दिले होते. आता अचानक कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उत्पादकांशी चर्चा करून त्वरित उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे.    - बी. मंत्री, सहायक आयुक्त,     अन्न व औषध प्रशासन विभाग

 ...तर तक्रार नोंदवा!- डॉक्टरांनी अत्यावश्यक असेल तरच रुग्णास रेमडेसिविर घेण्याची चिठ्ठी द्यावी. रेमडेसिविरची गरज भासल्यास अन्न औषध प्रशासनाच्या राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. - काळाबाजार करणाऱ्यांची माहिती १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे