‘ती’ची हत्या झाल्याचा नातेवाइकांचा आरोप

By Admin | Updated: March 16, 2015 03:20 IST2015-03-16T03:20:28+5:302015-03-16T03:20:28+5:30

मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अडीच वर्षीय ऋतुजा दुरकर हिचा शनिवारी तिच्याच घराजवळ मृतदेह आढळून आला.

The relatives of the murderer of 'She' were murdered | ‘ती’ची हत्या झाल्याचा नातेवाइकांचा आरोप

‘ती’ची हत्या झाल्याचा नातेवाइकांचा आरोप

मुंबई : मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अडीच वर्षीय ऋतुजा दुरकर हिचा शनिवारी तिच्याच घराजवळ मृतदेह आढळून आला. याबाबत ट्रॉम्बे पोलिसांनी घटनेची नोंद अपघाती मृत्यू अशी केली आहे. मात्र हा अपघात नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नगरातील शिवप्रेरणा चाळीत राहणारी ही चिमुरडी गुरुवारी सायंकाळी घराबाहेर खेळत होती. मात्र, बराच वेळ होऊनदेखील ती घरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठत अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस या मुलीचा शोध घेत असतानाच शनिवारी सकाळी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना तिच्या घराशेजारील गटारात मृतदेह आढळून आला. ट्रॉम्बे पोलिसांना ही बाब समजताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक माहितीमध्ये तिचा मृत्यू गटारात पडूनच झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The relatives of the murderer of 'She' were murdered