नवी मुंबईतील २० हजार बांधकामे नियमित करणार - मुख्यमंत्री

By Admin | Updated: March 12, 2015 14:07 IST2015-03-12T14:07:11+5:302015-03-12T14:07:42+5:30

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील २० हजार बांधकामे नियमित करण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

Regularization of 20 thousand constructions in Navi Mumbai - Chief Minister | नवी मुंबईतील २० हजार बांधकामे नियमित करणार - मुख्यमंत्री

नवी मुंबईतील २० हजार बांधकामे नियमित करणार - मुख्यमंत्री

>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. १२ - नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील २० हजार बांधकामे नियमित करण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी चार एफएसआय देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. लवकरच येऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने येथील रहिवाशांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील अनधिकृत बाधकामांचा प्रश्न ऐरणीवर होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने ही घोषणा केली आहे. 
 
 
 

Web Title: Regularization of 20 thousand constructions in Navi Mumbai - Chief Minister