शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये वीजपुरवठ्यासाठी फेरनिविदा

By admin | Updated: February 4, 2015 00:54 IST

मागणीच्या आधारे वीज एक्स्चेंजमधून दररोजची वीज खरेदीची कटकट नेहमीसाठी थांबविण्यासाठी काढण्यात आलेली वीज निश्चितीची निविदा एकच वीज निर्मिती कंपनीने भरल्याने सध्या ही

नागपूर : मागणीच्या आधारे वीज एक्स्चेंजमधून दररोजची वीज खरेदीची कटकट नेहमीसाठी थांबविण्यासाठी काढण्यात आलेली वीज निश्चितीची निविदा एकच वीज निर्मिती कंपनीने भरल्याने सध्या ही प्रक्रिया अयशस्वी ठरली आहे. ही प्रक्रिया मुंबईत पार पडली.मिहानमधील उद्योगांना घोषणेपेक्षा जास्त दराची वीज घ्यावी लागत असल्याची ओरड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत उद्योगांना प्रति युनिट ४.३९ रुपये दराने वीज उपलब्ध करून दिली. पण वीज उपलब्ध करून देण्यासाठी एमएडीसीला जास्त कसरत करावी लागत आहे. सध्या १४ ते १५ कंपन्यांकडून दररोज ६ ते ७ मेगावॅट विजेची मागणी असते. ही मागणी ३ मेगावॅटपासून सुरू होते. एमएडीसीला दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ६, सायंकाळी ६ ते रात्री १० आणि रात्री १० ते सकाळी ६ अशा वेळात उद्योगांना किती वीज लागते, याचा लेखाजोखा पॉवर एक्स्चेंजला द्यावा लागते. यासाठी एमएडीसीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चमू कार्यरत आहे. पॉवर एक्स्चेंजची भानगड नको आणि उद्योगांना थेट वीज मिळावी म्हणून वीजनिर्मिती कंपन्यांकडून निविदा मागविल्या होता. यामुळे कंपन्यांना रोज किती वीज लागते, तेवढीच वीज या वीज निर्मितीदारांकडून मिळणार होती आणि एमएडीसीची नेहमीची कटकट दूर होणार होती. पण २७ जानेवारीपर्यंत एकाच वीज निर्मिती कंपनीने निविदा भरल्याने फेरनिविदा काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. विजेचा पुरवठा कमी असल्याने वीज निर्मिती कंपन्यांनी निविदेकडे पाठ फिरविल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)