शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोळा टक्के राखूनच होणार भरती

By admin | Updated: February 20, 2015 01:12 IST

अंतिम निर्णय होईपर्यंत १६ टक्के जागा बाजूला ठेवूनच भरती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जुन्नर येथे दिली.

जुन्नर : मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळालेले १६ टक्के आरक्षण जरी न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय होईपर्यंत १६ टक्के जागा बाजूला ठेवूनच भरती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जुन्नर येथे दिली. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून बालशिवाजींना अभिवादन करण्यात आले. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार लक्ष्मण जगताप, शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे, अतुल बेनके आदी या वेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेली किल्ले शिवनेरीची पावनभूमी ही ऊर्जा देणारी भूमी आहे़ छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा राज्य कारभार करू व किल्ले शिवनेरी विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही़ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकासाठी केंद्र सरकारच्या लागणाऱ्या सगळ्या परवानग्या घेण्यात आल्या असून, लवकरच स्मारकाचे काम सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.च्परंपरेप्रमाणे किल्ले शिवनेरीवर आई शिवाई मंदिरात जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते सकाळी ६़३० वाजता अभिषेक करण्यातआला. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवाई मंदिरात पूजा बांधली जाणार असल्याने प्रशासन सज्ज होते. च्या वेळी खामगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी विनायक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन लाठीकाठी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले़ त्यास मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांनी दाद दिली. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पारंपरिक पद्धतीने बाल शिवाजी व जिजाऊ साहेबांना अभिवादन केले. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.