शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कचरा करणाऱ्यांकडून साडेआठ कोटी दंड वसूल

By admin | Updated: June 8, 2017 02:25 IST

अनेक वादानंतर पुनर्जीवन मिळालेल्या क्लीन अप मार्शल्सने स्वच्छतेची जोरदार कामगिरी सुरू ठेवली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनेक वादानंतर पुनर्जीवन मिळालेल्या क्लीन अप मार्शल्सने स्वच्छतेची जोरदार कामगिरी सुरू ठेवली आहे. त्यानुसार सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाऱ्या तीन लाख ९१ हजार बेशिस्त मुंबईकरांकडून मार्शल्सने तब्बल साडेआठ कोेटी दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे ही कारवाई एका वर्षाच्या कालावधीत करण्यात आली आहे.अनेक तक्रारींनंतर बंद करण्यात आलेली क्लीनअप मार्शल्स संकल्पना जुलै २०१६मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली. दुसऱ्याच महिन्यात मार्शल्सने एक कोटी १० लाख रुपये दंड वसूल केला. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व कचरा फेकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सार्वजनिक परिसर अस्वच्छ केल्याप्रकरणी दोनशे ते हजार रुपये दंड संबंधित लोकांना करण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्डच्या लोकसंख्येनुसार मार्शल्सची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांची नजर चौफेर आहे.पालिकेच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत मार्शल्सने तीन कोटी ३६ लाख रुपये दंड वसूल केला. यामध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक ८९.०९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळे वर्षभरातच पालिकेच्या तिजोरीत साडेआठ कोटी रुपये जमा झाले आहेत. या रकमेतील निम्मे म्हणजेच सुमारे चार कोटी रुपये मार्शल्स पुरवणाऱ्या कंपनीच्या तिजोरीत जाणार आहेत. मात्र मार्शल्सच्या या कामगिरीमुळे त्यांचे कंत्राट आणखी एक वर्षासाठी वाढविण्यात येणार आहे.असा वसूल केला दंड१ जुलै २०१६ ते ३१ मे २०१७ -साडेआठ कोटी रुपयेआॅगस्ट २०१६ - एक कोटी १० लाख रुपये१ जानेवारी ते ३१ मे - तीन कोटी ३६ लाख रुपयेएप्रिल २०१७ - ८९.०९ लाख रुपये