शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेल वितरण धोरणावर पुनर्विचार करा !

By admin | Updated: June 19, 2014 01:06 IST

राज्य शासनातर्फे ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा कमी रॉकेल वितरित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात रॉकेल वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या

हायकोर्टाचे आदेश : शासनाला चार आठवड्यांचा वेळनागपूर : राज्य शासनातर्फे ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा कमी रॉकेल वितरित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात रॉकेल वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रॉकेल वितरण धोरणावर येत्या चार आठवड्यांत पुनर्विचार करून माहिती सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. रॉकेल वितरण धोरणातील विसंगतीबाबत कवडू पुंड यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. आज, बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष याचिकेवर सुनावणी झाली. सध्याच्या धोरणानुसार शहरी भागात चार लिटर, तर ग्रामीण भागात दोन लिटर प्रती व्यक्ती रॉकेल वितरित करण्यात येत आहे. तसेच, शहरातील कुटुंबाला एका महिन्यात २२ लिटर, तर ग्रामीण कुटुंबाला १८ लिटर जास्तीतजास्त रॉकेल भेटू शकते. शहरात जवळपास सर्वांकडे एलपीजी कनेक्शन असल्यामुळे रॉकेलचा उपयोग कमी प्रमाणात केला जातो. ग्रामीण भागात स्वयंपाक करणे, लाईट नसल्यास दिवा लावणे, लाकडे पेटविणे इत्यादीसाठी रॉकेलचा उपयोग केला जातो. यामुळे त्यांची गरज शहरी नागरिकांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनातर्फे विसंगतीपूर्ण धोरण अमलात आणण्यात येत असल्यामुळे न्यायालयाने खंत व्यक्त केली. शासनाचे धोरण सत्य परिस्थितीला सुसंगत व तर्कशुद्ध असले पाहिजे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.११ जून रोजीच्या न्यायालयीन निर्देशानुसार राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी व्यक्तिश: उपस्थित राहून प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. याचिकेतील मूळ तक्रार समजून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले नाही, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, तर शासनातर्फे प्रभारी सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)