शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाचे शेतीवर दुष्परिणाम

By admin | Updated: March 27, 2015 23:42 IST

हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल.

पुणे : हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. शेतीचा पोत कमी होऊन, उत्पादनक्षमता कमी होईल. हे धोके टाळण्यासाठी त्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ‘हवामानबदल : सामाजिक-आर्थिक परिप्रेक्षातून’ या विषयावर आयोजित प्रा. पी. आर. पिशारोटी व्याख्यानात ते बोलत होते. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’ चे (आयआयटीएम) संचालक डॉ. एम. राजीवन, इंडियन मेट्रॉलॉजिकल सोसायटी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष ए. के. सहाय यावेळी उपस्थित होते. डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘लोकसंख्या हे भारतातील हवामान बदलांचे मूळ कारण आहे. त्यामुळे मूलभूत स्रोतांवरचा ताण वाढत आहे. त्यातून सार्वजनिक आरोग्याच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. शेतीचा पोत कमी होऊन, शेतजमीन क्षारपड होऊन तिची उत्पादन क्षमता कमी होईल. हे धोके टाळण्यासाठी सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे. सेंद्रिय शेती हा त्यावरचा एक प्रभावी मार्ग आहे. यासारख्या पर्यावरणपूरक शेतीला सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.’ पैशाच्या वाढत्या हव्यासामुळे गोव्यासारख्या प्रदेशात यांत्रिक नौका खोल समुद्रात बेसुमार मासेमारी करीत आहेत. त्यामुळे समुद्रात तेलाचे प्रदूषण होत आहे, असे त्यांनी सांगितले. ४हवामान बदलांचा परिणाम वन आणि वन्य प्राण्यांवरदेखील होणार आहे. त्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन केलेले सामूहिक प्रयत्न आणि वन हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी यातून देशातील वनक्षेत्राचे संवर्धन केले पाहिजे. ४देशातील वनांच्या संवधर्नासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे. पाचगाव (जि. चंद्रपूर) ने याचा वस्तुपाठ घालून दिला आहे, असेही ते म्हणाले.