शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

भाडेनियंत्रण कायद्यातून सुटका

By admin | Updated: May 8, 2015 06:01 IST

भाडेनियंत्रण कायद्याच्या अंमलातून ५०० चौ.फू.पेक्षा मोठे व्यापारी तर ८६२ चौ.फू. पेक्षा मोठे निवासी गाळे काढून त्यांचे भाडे पुढील तीन वर्षांनंतर

मुंबई : भाडेनियंत्रण कायद्याच्या अंमलातून ५०० चौ.फू.पेक्षा मोठे व्यापारी तर ८६२ चौ.फू. पेक्षा मोठे निवासी गाळे काढून त्यांचे भाडे पुढील तीन वर्षांनंतर बाजारभावाच्या १०० टक्के दराने वसूल करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. यामुळे जुन्या इमारतींच्या विकासाचा मार्ग मोकळा होऊन भाडेपट्ट्यावर घरे उपलब्ध होतील, असा विश्वास सरकारमधील उच्चपदस्थ व्यक्त करीत आहेत.भाडेनियंत्रण कायद्यानुसार भाडेवाढीवर मर्यादा असल्याने अनेक जुन्या इमारतींमधील भाडेकरु अत्यंत नाममात्र भाड्याने राहत आहेत. परिणामी मालकांनी इमारतींच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. अशा नादुरुस्त इमारतींच्या पुनर्विकासाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. भाडेकरु पुनर्विकासास तयार होत नाहीत . भाडेनियंत्रण कायद्यातील या बदलामुळे भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध होतील व केंद्राची घोषणा पूर्णत्वाला जाण्यास हातभार लागेल, असा विश्वास सरकारला वाटतो.राज्य सरकारचे प्रस्तावित गृहनिर्माण धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंजुरीकरिता सादर केले आहे. त्यांनी मंजुरी दिल्यावर त्यावर लोकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील. त्यानंतर त्याला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. ५०० चौ.फू. क्षेत्रफळापेक्षा मोठे व्यापारी, ८६२ चौ.फू. क्षेत्रफळापेक्षा मोठे गाळे बाजारभावाच्या १०० टक्के दराने भाडेतत्त्वावर देण्याची तरतूद या धोरणात आहे. या कायद्यातून मोठी बांधकामे बाहेर काढल्यावर व्यापारी व निवासी भाडेकरुंवर ताण पडून असंतोष निर्माण होऊ नये याकरिता निर्णय झाल्यापासून पुढील तीन वर्षे बाजारभावाच्या ५० टक्के दराने त्यांना भाडे आकारण्यात येईल. चौथ्या वर्षापासून १०० टक्के दराने भाडे आकारणी करता येईल. मात्र जागा मालकांनी भाडेवाढीपोटी भाडेकरुंना नाडू नये याकरिता भाड्याची रक्कम ही भाडेकरुच्या उत्पन्नाच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, असे बंधन घालण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)