शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

कोरेगाव-भीमाच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा; रामदास आठवलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 3:07 PM

यावेळी दलित-सवर्ण मुद्द्यावर बोलताना आठवले म्हणाले, दलीत-सवर्णांना जोडण्यासाठी आणि दलितांवर होणारे अत्याचा थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी. तसेच देशातील दलित आणि सवर्णांमधील गैरसमज दूर व्हायला हवेत.

ठळक मुद्देकोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा.यासाठी आपण शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असेही आठवले यांनी म्हटले आहे.दलीत-सवर्णांना जोडण्यासाठी आणि दलितांवर होणारे अत्याचा थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी - आठवले

पुणे - कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा. हा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. यासाठी आपण शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असेही आठवले यांनी म्हटले आहे. आठवले यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी दलित-सवर्ण मुद्द्यावर बोलताना आठवले म्हणाले, दलीत-सवर्णांना जोडण्यासाठी आणि दलितांवर होणारे अत्याचा थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी. तसेच देशातील दलित आणि सवर्णांमधील गैरसमज दूर व्हायला हवेत. गावागावांत एकी निर्माण व्हायलहा हवी आणि गावात एकी निर्माण झाली, की देशाचा विकास झपाट्याने होईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2021 मध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित आदिवासी, ओबीसी आणि सवर्ण या सर्वांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असेही आठवले यावेळी म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांना उत्तर -प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी कोणताही ठोस प्लॅन नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात पत्रकारांनी विचाले असता, आठवले म्हणाले, राज्याकडे कोणताही प्लॅन नाही, हे मला माहिती आहे. मात्र, अर्थव्यवस्था पट्रीवर आणण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस योजना आहे. आगामी बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर मदत केली जाईल.

‘मी रिपब्लिकन’ अशी आमची घोषणा -नव्या वर्षाच्या संकल्पासंदर्भात विचारले असता, नव्या वर्षात आपण रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत करण्याचा संकल्प केला आहे. ‘मी रिपब्लिकन’अशी आमची घोषणा असेल, असे आठवले म्हणाले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर