शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Ramdas Athawale Interview: मोदींना हसविणे सोपे नव्हते, ते केले; रामदास आठवलेंनी सांगितले भाजपाकडे कसा वळलो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 10:29 IST

Ramdas Athawale Interview Rajkarnachya Palikade: लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी रामदास आठवले यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मुलाखत घेतली. यावेळी रामदास आठवलेंनी आईच्या आठवणी सांगितल्या.

माझं मन कवितेत, गावात, दिल्लीत असते. या देशातील गरीब माणसाला न्याय देण्यासाठी माझे मन असते. माझ्याकडे पाहिले तर लोकांना वाटते की हा नेता नाही. नरेंद्र मोदींना हसविणे सहजासहजी कोणाला जमलेले नाही. ते मी केले, असे सांगतानात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. यावेळी त्यांनी त्याच्या आईने केलेले अपार कष्ट देखील नमूद केले. (Ramdas Athawale Interview  by Lokmat. telling mother's sacrifices.)

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी रामदास आठवले यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मुलाखत घेतली. यावेळी रामदास आठवलेंनी आईच्या आठवणी सांगितल्या. माझी आई शेतमजूर म्हणून काम करायची. मी सहा महिन्यांचा असताना वडील नायगावमध्ये कामगार होते. लहानपणीच त्यांचे छत्र हरपले. त्यामुळे आजोळी मी वाढलो, शिकलो. तेथील शाळेत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरीत झालो. आई माझ्यासाठी शेतात राब राब राबली. आईने मला शिकविले नसते तर मी आज इथे पोहोचू शकलो नसतो. गूळ, आंबे मला खूप आवडायचे. पाटलाच्या शेतातून दोन-तीन ऊस तोडून आणायची. हॉस्टेलला असताना आई दररोज एसटीतून डबा पाठवायची. बस स्टॉपवर जाऊन तो डबा घ्यायचो. सकाळी उठून ती डबा बनवायची, अशा आठवणी आठवलेंनी जागवल्या. यावेळी ते काहीसे भावूक देखील झाले.  

बाबासाहेबांची चळवळ ही दलित आणि सवर्णांना वेगळे करणारी नव्हती, तर ती एकत्र आणणारी होती, असे आठवले म्हणाले. 

माझे मुंबईत घर नव्हते...शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना मला राज्यात मंत्री केले. तेव्हा मी सातपुडा बंगल्यावर आलो. सत्ता गेल्यानंतर मला मुंबईत रहायला घर नव्हते. 6000 रुपये भाडे देवून मी दुसरीकडे राहत होतो. मंत्री असताना मला एक जमीन मिळाली होती. तिथे मी घर बांधले आणि 2011 मध्ये तिथे रहायला गेलो, अशी आठवण रामदास आठवलेंनी सांगितली.  

भाजपाकडे कसा वळलो...शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली तर काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले. मग मी राज्यभरातील लोकांशी संवाद साधला. बाळासाहेब ठाकरेंची बाजू मांडली. ठाकरेंबाबत कश्या अफवा पसरविल्या असे त्यांना सांगितले. त्यानंतर राजकारणात असे होऊ शकते, असा निर्णय घेऊन आम्ही युतीत आलो. आता भाजपासोबत आहे, असा खुलासा रामदास आठवलेंनी केला.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे