शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 01:33 IST

Raj Thackeray Pahalgam Attack: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल एक मोठं विधान केले. काश्मीरमध्ये काहीतरी मोठं होणार आणि पर्यटकांना मारतील, असे मला आधीच जाणवत होतो. मी हे वर्षभरापासून अनेकांशी बोलत होतो, असे विधान राज ठाकरेंनी केली. 

Raj Thackeray Latest News: 'तुम्हाला आज जे सांगतोय, ते सत्य आहे. शपथपूर्वक सांगतोय. ज्यांच्याशी बोललो त्या लोकांसोबत भेटी करून देईन. पहलगामची घटना घडल्यानंतर मला अनिल शिदोरेंचा मेसेज आला की, तुम्ही बोललात तसे झाले', असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल मोठे विधान केले. काश्मीरमध्ये पर्यटकांची हत्या करतील हे मला आधीच जाणवू लागलं होतं, असा दावा करताना त्यांनी यामागील कारणही सांगितले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात मुलाखत झाली. मुंबईतकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पहलगामधील दहशतवादी हल्ल्याबद्दल एक मोठं विधान केले. 

वाचा >>'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान

राज ठाकरे म्हणाले, "मी काय म्हणालो आणि त्याचे तुम्ही काय अर्थ काढता. त्यावर मी तो अर्थ नाही, त्याचा अर्थ हा आहे, असे सांगायला मी का येऊ? आता पहलगामचं जेव्हा झालं. त्यानंतर मी बोललो. अनेकांना वाटलं की मी देशाच्या विरोधात काहीतरी बोललोय. कसलं देशाच्या विरोधात? माझी प्रतिक्रिया एकदा ऐका. ते सगळं झाल्यावर राज ठाकरे आठवला की युद्ध परवडणारे नाही. अनेक लोक बोलली मला. अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या", असे राज ठाकरे म्हणाले. 

युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल -राज ठाकरे

राज ठाकरेंनी पुढे बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, "तुमचा कोणाचा विश्वास बसणार नाही. ती व्यक्ती इथे नाहीये. अनेकजण आहेत. त्यांच्या मी तुम्हाला भेटी करून देईन. मी कोणी ज्योतिषी नव्हे. मी अनेकदा सांगितलं. मी मागच्या वेळीही सांगितलं होतं आठवतं तुम्हाला? युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. तीन चार वर्षापूर्वी. यावेळी मी ही गोष्ट फक्त बोललो नाही."

राज ठाकरे म्हणाले, सत्य सांगतोय शपथपूर्वक सांगतोय

याच मुद्द्यावर ते पुढे म्हणाले, "याच कारण मला कोणत्याही प्रकारची हिंट द्यायची नव्हती. कारण राज ठाकरेंनी ही हिंट दिली असं व्हायला नको म्हणून मी सार्वजनिक ठिकाणी ही गोष्ट बोललो नाही. पण तुम्हाला जे सांगतोय आता, ते सत्य आहे. शपथपूर्वक सांगतोय. गेले वर्षभर आमचे अनिल शिदोरे असतील किंवा आमचे इतर... मी त्यांच्यासोबत तुमच्या भेटीही करून देईन."

"अनेकांशी मी वर्षभर बोलतोय की, काश्मीरमध्ये काहीतरी मोठी घटना घडेल. आणि मी हेही बोललो होतो की, पर्यटकांना मारतील. ३७० कलम रद्द झाल्यानंतरची काश्मीरची जी परिस्थिती होती. आपले लोक तिकडे जात होते. खेळत होते. सगळ्या गोष्टी होत्या. मला ते जाणवत होतं काश्मीरबद्दलचं. काय आहे की, शांतता आणि सन्नाटामधील फरक तुम्हाला समजला पाहिजे", असे राज ठाकरे म्हणाले. 

हल्ला होईल असं राज ठाकरेंना का जाणवलं?

"शांतता ही आल्हाददायक असते. सन्नाटा ही गंभीर गोष्ट असते. काश्मीरमध्ये मला जे जाणवत होतं, तो सन्नाटा होता. त्यातील बाहेर काय गोष्टी पडतील मला माहिती नाही. परंतू मी आता पण तुम्हाला मोबाईल दाखवयाला तयार आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, अनिल शिदोरेंचा मला मेसेज आला. तुम्ही बोललात तसे झाले. मी भविष्यवेत्ता नाही. माझे काही ठोकताळे आहेत. माझे काही अंदाज आहे. मला आतून काही गोष्टी वाटतात ही गोष्ट होईल. मी त्या प्रकारे सांगतो. मी हे निवडणुकीसाठी बोलत नाही", असे राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरMNSमनसेterroristदहशतवादी