शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

कोकण, मध्य महाराष्ट्रातच पावसाचा जोर, मराठवाडा, विदर्भाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 1:12 PM

पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.

पुणे : कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातच पावसाने सध्या धुमाकूळ घातला असून, कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला़. मराठवाडा व विदर्भाकडे पावसाने पाठ फिरविली असून, तेथे अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे़. पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. गेल्या २४ तासांत जव्हार, खालापूर, माथेरान, संगमेश्वर, देवरुख, विक्रमगड ७०, वाल्पोई ६०, बेलापूर, चिपळूण, खेड, माणगाव, मुंबई ५०, कर्जत, महाड, राजापूर, रोहा, सावंतवाडी, श्रीवर्धन, सुधागड, पाली, वैभववाडी ४०, दोडामार्ग, लांजा, मुल्दे, पेडणे, पोलादपूर, फोंडा, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, वाडा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती़. याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़. मध्य महाराष्ट्रात चांदगड, राधानगरी, सिन्नर ८०, जावळी मेधा, ओझर, पन्हाळा, शाहुवाडी, वेल्हे ७०, इगतपुरी, पाटण, सुरगाणा ६०, आंबेगाव, गारगोटी ५० मिमी पाऊस झाला़ .मराठवाड्यातील अंबेजोगाई, मोमिनाबाद, औसा, मनवत, पाथरी, सोयेगाव २०, गेवराई, कन्नड, मांजलगाव, सिल्लोड, वैजापूर, वडवाणी १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात बुलढाणा ३०, भामरागड, धनोरा, एटापल्ली, कोर्ची, मोहाडी, मुलचेरा २०, अकोट, अजुर्नी मोरगाव, आरमोरी, बालापूर, बार्शी टाकळी, भिवापूर, ब्रम्हपुरी, चिखली, देवळी, धारणी, घाटंजी, गोंदिया, खामगाव, कुरखेडा, लाखंदूर, मालेगाव, मारेगाव, मोताळा, पांढरकवडा, पातूर, सडक, अजुर्नी, सकोली, सलेकसा, सावनेर, शेगाव, सिरोंचा, वारोरा, यवतमाळ १० मिमी पाऊस झाला होता़.सोमवारी दिवसभरात पुणे २६, महाबळेश्वर ७९, कोल्हापूर ७, जळगाव ९, नाशिक ७, सातारा ११, सोलापूर ५, मुंबई १५, सांताक्रुझ १२२, अलिबाग ३९, रत्नागिरी ११, पणजी ४, डहाणु १, औरंगाबाद ४, बुलढाणा १०, गोंदिया १३, नागपूर ५, वाशिम २ मिमी पाऊस झाला आहे़. ९ ते ११ जुलै दरम्यान कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता़ १२ जुलैला कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बºयाच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता़ इशारा : ९ जुलैला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस़ १० ते १२ जुलै दरम्यान कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा़़़़़़़़़़़गेल्या २४ तासांत झालेला पाऊसकोयना (नवजा) ३४०, तलासरी २२०, त्र्यंबकेश्वर २००, शिरगाव १९०, ओझरखेडा १७०, महाबळेश्वर १४०, हसुल, ताम्हिणी, दावडी १३०, लोणावळा, पौड मुळशी, पेठ १२०, डुंगरवाडी, आजरा, गगनबावडा, लोणावळा (कृषी) १००, भिरा, मुंडणगड, मोखेडा, मुरुड, पेण ९० मिमी पाऊस पडला आहे़.  

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळ