शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीचा चौथा बळी विक्रोळीच्या राहुल सपकाळचा मृत्यू

By admin | Updated: June 15, 2014 02:06 IST

नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेने आज चौथा बळी घेतला. विक्रोळीला राहणारा राहुल रमेश सपकाळ पाच किलोमीटरचे अंतर धावून पार केल्यानंतर कोसळला

मुंबई : नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेने आज चौथा बळी घेतला. विक्रोळीला राहणारा राहुल रमेश सपकाळ पाच किलोमीटरचे अंतर धावून पार केल्यानंतर कोसळला होता. मात्र, उपचारांदरम्यान आज सकाळी ९ च्या सुमारास मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात त्याचे निधन झाले. पोलीस दलात भरती होण्याच्या जिद्दीने राहुल सपकाळ चाचणीसाठी गेला होता. ११ जूनला मैदानी चाचणीसाठी त्याला पूर्व द्रुतगती मार्गावरील भरती केंद्रावर बोलावले होते. सकाळी ७ वाजता केंद्रावर हजर व्हा, असे आदेश पोलिसांकडून त्याला मिळाले होते. त्यामुळे सकाळी ६ च्या ठोक्यालाच राहुल केंद्रावर हजर झाला. प्रत्यक्षात दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याची चाचणी घेण्यात आली. याआधी मृत्यू झालेला विशाल केदारे हा नाशिकचा तरुणही याच राउंडमध्ये सहभागी झाला होता. विशाल थोडे अंतर धावून खाली कोसळला. राहुलने मात्र पाच किलोमीटरचे अंतर पार केले. चाचणी पूर्ण केल्याने त्याला १० गुण मिळाले खरे, मात्र चाचणी पूर्ण केल्यानंतर तो खाली कोसळला. केंद्रावरील पोलिसांनी राहुलला प्रथमोपचार देऊन मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. विशालही याच रुग्णालयात दाखल होता. दोघांचीही प्रकृती सतत खालावू लागल्याने त्यांना मुलुंडच्या प्लॅटिनम रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील उपचारांमुळेही राहुलची प्रकृती सुधारत नसल्याचे पाहून त्याला फोर्टीस रुग्णालयात दाखल केले. विशाल मात्र प्लॅटिनम रुग्णालयातच उपचार घेत होता. काल विशालचा मृत्यू झाला आणि आज राहुलने अखेरचा श्वास घेतला.बळी गेल्यानंतर आली जागमैदानी चाचणीसाठी पाच किलोमीटरचे अंतर उमेदवारांना धावून पूर्ण करायचे असते. मात्र, ही धावण्याची चाचणी सकाळी ७ ते ९ आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत घ्यावी, असा नियम आहे. मग, विशाल आणि राहुल हे दुपारी साडेबारा वाजता कसे काय धावले? या गैरसोयीमुळे कालपर्यंत तीन बळी घेतले. त्यानंतर, पोलिसांनी वेळेनुसार चाचणी घेण्याचे ठरवले.