शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

दूध खरेदी २0 रुपयांनीच

By admin | Updated: July 24, 2015 01:19 IST

सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून २० रुपये दराने दूध खरेदी करावी आणि ग्राहकांनादेखील २ रुपये कमी दराने दुधाची विक्री

मुंबई : सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून २० रुपये दराने दूध खरेदी करावी आणि ग्राहकांनादेखील २ रुपये कमी दराने दुधाची विक्री करावी असे निर्देश सहकार कायद्यान्वये देण्यात आले आहेत. पण जे सहकारी दूध संघ हे निर्देश मान्य करणार नाहीत ते बरखास्त केले जातील, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत रात्री उशिरा केली.विरोधकांनी आणलेल्या २९३च्या प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते. मात्र सभागृहात बोटावर मोजण्याएवढेच विरोधी सदस्य उपस्थित होते. खडसे यांनी या वेळी अनेक घोषणा केल्या. ते म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे अशांना बियाणेदेखील मोफत दिली जातील. चाऱ्याच्या छावण्या न उभ्या करता चारा आणि पशुखाद्य निर्माण करण्यासाठी अनुदान दिले जाईल. टँकर लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना असलेले अधिकार बीडीओ आणि तहसीलदारांना दिले जातील. स्थानिक आमदारांशी चर्चा करून टँकर चालू करण्याचे निर्णय घेतले जातील. राज्यातील छोट्या शेतकऱ्यांना डिझेल पंप ५० टक्के सवलतीत दिले जातील. शिवाय काही लीटर डिझेलही मोफत दिले जाईल. या पंपांच्या साहाय्याने असे शेतकरी पाणी काढू शकतील आणि उरलेल्या वेळात त्याचा वापर विजेसाठी त्यांना करता येईल, असेही खडसे म्हणाले. राज्यातील १ कोटी ३५ लाख खातेदार शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे आहे. पण ज्यांच्या नावावर शेती आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याचा अपघात विमा सरकारतर्फे काढला जाईल; आणि त्यात शेतकऱ्याच्या आत्महत्यांचादेखील समावेश करावा यासाठी विमा कंपन्यांशी बोलणी झाल्याचे खडसे यांनी जाहीर केले. १ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या आर्थिक दृष्टीने दुर्बल शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. ही मर्यादा आता अडीच लाख उत्पन्नापर्यंत केल्याचे ते म्हणाले. औरंगाबादला डॉपलर रडार पोहोचले असून, दोन-तीन दिवसांत त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण होतील व परिस्थितीनुसार कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी केली जाईल; पण ती वेळ सरकारवर येऊ नये अशी आपली इच्छा असल्याचे खडसे यांनी सांगितले.एफआरपीचा कायदा केंद्राने केला आहे. तो रद्द करण्यासाठीचे बिल जर लोकसभेत आणले गेले तर काँग्रेस त्याला पाठिंबा देईल असे आपणास पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे मात्र लोकसभा शांततेत चालली तर तसे बिल आणता येईल असा चिमटाही खडसे यांनी काढला. (विशेष प्रतिनिधी)