शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

८० कोटींच्या भूखंडाची खरेदी

By admin | Updated: July 28, 2015 03:00 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रमेश कदम याने मुंबईतील उच्चभ्रू पेडर रोडवर ८० कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- यदु जोशी,  मुंबई लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रमेश कदम याने मुंबईतील उच्चभ्रू पेडर रोडवर ८० कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कागदोपत्री एवढी रक्कम दिसत असली तरी प्रत्यक्षात या व्यवहारासाठी यापेक्षाही अधिक रक्कम मोजली गेली असल्याची दाट शक्यता आहे. महामंडळात घोटाळ्यांचे इमले रचणाऱ्या कदमने या ठिकाणी आलिशान बंगला बांधण्याचे स्वप्न बाळगले होते. सीआयडीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यापासून कदम फरारी आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, सीआयडीने केलेल्या चौकशीमध्ये पेडर रोडवर कदमने ८०० चौरस मीटरचा प्लॉट खरेदी केल्याची माहिती समोर आली. पेडर रोडसारख्या लब्धप्रतिष्ठितांच्या वस्तीत या प्लॉटची किंमत यापेक्षा कितीतरी जास्त आहे. याचा अर्थ काही रक्कम ‘ब्लॅक’मध्ये दिली असण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. या शिवाय कदम याच्या पत्नीच्या नावानेही मुंबईसह काही शहरांमध्ये जमिनी खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. कदम याच्या अनेक घोटाळ्यांमध्ये सामील असलेला त्याचा पीए विजय कसबे याला अटक करण्यात आली आहे. कदमने रोजंदार कर्मचाऱ्यापासून उपमहाव्यवस्थापक म्हणून एकदम बढती दिलेली एक महिला महामंडळाच्या चेंबूरमधील मुख्यालयात नोकरी करते. ती दोन दिवसांपासून गायब असून, तिने मोबाइल बंद ठेवला आहे. कारकून महिलेला अटकमहामंडळाची एक कारकून वैशाली बेंद्रे हिला अटक करण्यात आली आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या थकबाकीपोटी २ कोटी ५० लाख रुपये द्यायचे होते. त्यातील निम्मी रक्कम कदम घेईल आणि निम्मी कर्मचाऱ्यांना दिली जाईल, असा अलिखित करार झाला होता. सूत्रांनी सांगितले की कदमच्या वतीने वैशालीने १ कोटी २५ लाख रुपये घेतले आणि पैसे मिळाल्याच्या पावत्या कर्मचाऱ्यांना दिल्या. वैशालीच्या नावावर मोठी संपत्ती असल्याचे सांगितले जाते. औरंगाबादमध्ये महामंडळाच्या १२ कोटी रुपयांतून दोन एकर जमीन खरेदी करण्यात आली होती. खरेदीसाठीचा इतर खर्च म्हणून ६५ कोटी रुपये देण्यात आले. त्यातील १८ लाख रुपये वाचले. या १८ लाखांचा डीडी घेऊन तारळकर नावाची व्यक्ती औरंगाबादहून मुंबईच्या मुख्यालयात आली आणि तिने हा डीडी नाशिकमधील महामंडळाचा प्लॉट खरेदी केल्याच्या मोबदल्यात जमा केला. या भयंकर घोटाळ्याने तपास यंत्रणा चक्रावून गेली आहे.