कारेगावच्या 'सोशल मीडिया स्टार' निर्मला नवलेंचे काय झाले? इंजिनिअर, सरपंच... लोकांचाही होता मोठा पाठिंबा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:55 IST2026-02-09T13:53:28+5:302026-02-09T13:55:05+5:30

Nirmala Nawale Karegaon Sarpanch : शल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना दिवंगत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिली होती.

Pune ZP Election result 2026: What happened to Karegaon's 'social media star' Nirmala Navale? Engineers, sarpanch... people also had great support... ncp Ajit pawar Candidate | कारेगावच्या 'सोशल मीडिया स्टार' निर्मला नवलेंचे काय झाले? इंजिनिअर, सरपंच... लोकांचाही होता मोठा पाठिंबा...

कारेगावच्या 'सोशल मीडिया स्टार' निर्मला नवलेंचे काय झाले? इंजिनिअर, सरपंच... लोकांचाही होता मोठा पाठिंबा...

सोशल मीडियावरील आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पंचायत समिती निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या कारेगाव पंचायत गटातून निर्मला नवले यांचा पराभव झाला असून, मनीषा पाचंगे यांनी त्यांचा पराभव करत विजय संपादन केला आहे.

निर्मला नवले या केवळ शिरूर तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंमुळे प्रसिद्ध आहेत. माजी सरपंच म्हणून त्यांनी केलेली कामे आणि बोलण्याची धाटणी यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात मतदारांनी मनीषा पाचंगे यांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.

सोशल मीडियावरील क्रेझ कमी पडली?
निवडणुकीच्या प्रचारात निर्मला नवले यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती. डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून ही निवडणूक त्या सहज जिंकतील असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, ग्राऊंड लेव्हलवर मनीषा पाचंगे यांनी केलेल्या नियोजित प्रचारामुळे निर्मला नवले यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिरूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या या निकालाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Web Title : कारेगांव की सोशल मीडिया स्टार निर्मला नवले चुनाव हारीं: क्या हुआ?

Web Summary : सोशल मीडिया पर अपनी पहचान रखने वाली निर्मला नवले को पुणे जिला परिषद चुनाव में हार का सामना करना पड़ा। अपनी लोकप्रियता के बावजूद, मनीषा पांचंगे ने जीत हासिल की। जमीनी स्तर पर प्रचार महत्वपूर्ण साबित हुआ, जिससे राजनीतिक चर्चा छिड़ गई।

Web Title : Karegaon's Social Media Star Nirmala Navale Lost Election: What Happened?

Web Summary : Nirmala Navale, known for her social media presence, faced defeat in the Pune Zilla Parishad election. Despite her popularity and perceived easy win, Manisha Pachange secured victory. Ground-level campaigning proved crucial, sparking political discussions.