शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

इन्व्हेस्टमेंट फंडाची तरतूद आशादायी : माशेलकर

By admin | Updated: July 10, 2014 23:07 IST

केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प चांगला आहे. यामध्ये पायाभूत सोयी-सुविधा, नोकरी आदी महत्वाच्या गोष्टींवर अधिक भर दिला आहे.

केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प चांगला आहे. यामध्ये पायाभूत सोयी-सुविधा, नोकरी आदी महत्वाच्या गोष्टींवर अधिक भर दिला आहे. यादृष्टिकानोतून हा अर्थसंकल्प छान वाटला. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रच्या विकासासाठी नॅनो टेकAॉलॉजी व बायो टेकAॉलॉजीवर बराच जोर देण्यात आला आहे. याच्या विकासासाठी मोठया गुंतवणूकीचा विचार करण्यात आला आहे, ही चांगली गोष्ट आहे. याचबरोबर टेकAॉलॉजी इन्व्हेसमेंट फंड निर्माण करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे. ही चांगली सुरूवात आहे, असे म्हणावे लागेल. 
ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर होणो आवश्यक असते. हा विचार ग्राहय धरत अर्थसंकल्पात यासाठी इन्क्युबेटर एक्सलेटर वर भर देण्यात आला आहे. यामुळे शास्त्रज्ञांकडून केले जाणारे संशोधन आता प्रत्यक्षात व्यवहारात येण्यासाठी चालना मिळेल. आपला देश हा शेतीप्रधान आहे. त्यामुळे अॅग्री रिसर्च होणो महत्वाचे आहे. मात्र आतार्पयत याकडे जास्त लक्ष दिले जात नव्हते. आता त्यावर जोर दिला जाणार असून त्यासाठी नव्या इन्स्टिटयूट स्थापन्यात येतील, असे अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे. ही चांगली गोष्ट आहे.
विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रचा विचार करताना इनोव्हेशन, शिक्षण यांचाही विचार करणो क्रमप्राप्त होते. यंदाच्या अर्थसंकल्पात या सर्वाचा एकत्रित विचार करून त्यांना जोडणारे निर्णय घेण्यात आले आहेत. आज आपल्या देशातील उच्च शिक्षणाचा स्तर वाढत आहे आणि उच्च शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याची संख्या वाढत आहे, हे ग्रॉस एनरॉलमेंड रेशोवरून दिसून येत आहे. सध्या हा रेशो 2क् टक्क्यांवर आला आहे. काही वर्षापूर्वी हा 5 ते 15 टक्क्यांच्या दरम्यान होता. तो वाढल्यामुळे उच्च शिक्षणाचा स्तर वाढविण्याचे आणि तो उच्च दर्जाचा करण्याचे आव्हान आहे. यासाठी 5 आयआयटी, 5 आयआयएम आणि 12 वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. ही उल्लेखनिय गोष्ट आहे. यामुळे उच्च शिक्षणाला चालना मिळण्याचा मार्ग सोप्पा झाला आहे. 
 
विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रचा विस्तार करण्याचा सरकारचा निर्णय या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिसून येत आहे. प्रत्यक्षात एवढी अपेक्षा नव्हती. अपेक्षा जेवढया करतो तेवढया त्या वाढतच जातात. पण यंदाच्या अर्थसंकल्पात खर्च किती केला आहे, हे पाहण्यापेक्षा तो कशावर करण्यात आला आह़े कशा प्रकारे करण्यात येणार आहे, हे पाहणो महत्वाचे आहे. यामुळे यंदाचा अर्थसंकल्प चांगले निर्णय घेऊन आलेला आहे.
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ