शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

प्रोथोनोटरी पदावर वरिष्ठ न्यायिक अधिकारी नेमावा-हायकोर्ट

By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST

‘प्रोथोनोटरी अ‍ॅण्ड सीनियर मास्टर’ या सर्वांत वरिष्ठ प्रशासकीय पदावर भविष्यात राज्याच्या न्यायिक सेवेतील ज्येष्ठ न्यायिक अधिकाऱ्याची नेमणूक करावी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेवरील ‘प्रोथोनोटरी अ‍ॅण्ड सीनियर मास्टर’ या सर्वांत वरिष्ठ प्रशासकीय पदावर भविष्यात राज्याच्या न्यायिक सेवेतील ज्येष्ठ न्यायिक अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी सूचना तीन न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने न्यायालयाच्या प्रशासनास केली आहे.न्या. नरेश पाटील, न्या. एस. सी. गुप्ते आणि न्या. ए. के. मेनन यांनी हे मत व्यक्त केले. ‘हायकोर्ट ओरिजिनल साईड रूल्स’मधील नियम ९८६ अन्वये ‘आॅफिस आॅब्जेक्शन’चे निराकरण केले नाही म्हणून एखादा दावा, याचिका अथवा अर्ज फेटाळण्याच्या आधी स्वत:च दिलेला आदेश प्रोथोनोटरी व सीनियर मास्टर रद्द करू शकतात का? या मुद्द्यावर द्विसदस्यीय न्यायाधीशांच्या दोन खंडपीठांच्या निकालांमध्ये मतांतरे दिसून आल्याने हा विषय निर्णायक निकालासाठी मुख्य न्याायधीशांनी तीन न्यायाधीशांच्या पूर्णपीठाकडे सोपविला होता. त्यावर दिलेल्या निकालपत्रात हे मत व्यक्त केले गेले.खरेतर, गेल्या वर्षी ९ सप्टेंबर रोजी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठानेही लॉरेन्स फर्नांडिस वि. महाराष्ट्र सरकार या प्रकरणाच्या निकालात हीच सूचना केली होती. आता त्रिसदस्यीय पूर्णपीठानेही त्याचाच पुनरुच्चार केला आहे. प्रोथोनोटरी व सीनियर मास्टर अनेक वेळा प्रशासकीय पातळीवर प्रकरणे फेटाळत असतात किंवा फेटाळलेली प्रकरणे पुनरुज्जीवित करीत असतात, असे निदर्शनास आल्यानंतर खंडपीठाने असे म्हटले होते की, असे होऊ नये यासाठी एकतर मूळ शाखेशी संबंधित प्रकरणांच्या बाबतीतही प्रोथोनोटरी व सीनियर मास्टर यांच्याकडे दिलेले न्यायिक अधिकार रजिस्ट्रार (ज्युडिशियल) यांच्याकडे वर्ग करावेत किंवा प्रोथोनोटरी पदावर वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्याची नेमणूक करावी. अर्थात उच्च न्यायालयाने हा निर्णय प्रशासकीय पातळीवर घ्यायचा आहे.उच्च न्यायालय प्रशासनाच्या मूळ शाखा व अपिली शाखा अशा दोन बाजू आहेत. या दोन्हींचे मिळून रजिस्ट्रार जनरल हे प्रशासकीय प्रमुख असतात. अपिली शाखेच्या प्रशासकीय प्रमुखास रजिस्ट्रार असे म्हटले जाते व त्या पदावर न्यायिक सेवेतील जिल्हा न्यायाधीश दर्जाचा अधिकारी नेमला जातो. प्रोथोनोटरी व सीनियर मास्टर हे मूळ शाखेचे प्रशासकीय प्रमुख असतात. मात्र अपिली शाखेच्या रजिस्ट्रारप्रमाणे प्रोथोनोटरी व सीनियर मास्टर न्यायिक सेवेतील अधिकारी नसतात. आता रजिस्ट्रारप्रमाणे प्रोथोनोटरीही न्यायिक अधिकारी असावा, असे खंडपीठांनी सुचविले आहे. (विशेष प्रतिनिधी)>देशातील एकूण २३ उच्च न्यायालयांपैकी फक्त मुंबई, मद्रास व कोलकाता या तीनच उच्च न्यायालयांच्या प्रशासनात ‘प्रोथोनोटरी अ‍ॅण्ड सीनियर मास्टर’ हे पद अस्तित्वात आहे. भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असताना ब्रिटिश सम्राटांनी २८ फेब्रुवारी १८६५ रोजी जारी केलेल्या ‘लेटर्स पेटन्ट’नुसार या तीन उच्च न्यायालयांची स्थापना झाली. >या ‘लेटर्स पेटन्ट’च्या कलम ८ अन्वये मुख्य न्यायाधीशांना न्यायालयाची प्रशासकीय व न्यायिक कामे पार पाडण्यासाठी वेळोवेळी गरजेनुसार विविध अधिकारी नेमण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार ‘प्रोथोनोटरी अ‍ॅण्ड सीनियर मास्टर’ हे पद तयार केले गेले. सुमारे १५ वर्षांपूर्वीपर्यंत उच्च न्यायालय प्रशासनाचे मूळ शाखा व अपिली शाखा असे दोन कप्पेबंद भाग होते. त्यानंतर रजिस्ट्रार जनरल हे या दोन्ही शाखांचे सामायिक प्रमुखपद निर्माण केले गेले.