शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, अंगणवाड्यांत अंडी देण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: September 30, 2015 02:46 IST

देशातील १४ राज्यांनी माध्यान्ह पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यानंतर आता पशुसंवर्धन विभाग शाळा तसेच अंगणवाड्यांत इतर आहाराऐवजी उकडलेली अंडी देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविणार आहे.

सुधीर लंके, पुणेदेशातील १४ राज्यांनी माध्यान्ह पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यानंतर आता पशुसंवर्धन विभाग शाळा तसेच अंगणवाड्यांत इतर आहाराऐवजी उकडलेली अंडी देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविणार आहे. ९ आॅक्टोबरला ‘जागतिक अंडी दिवस’ आहे. यानिमित्ताने पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तालयाने हा प्रस्ताव तयार केला आहे. आईच्या दुधानंतर अंड्यांत सर्वांत जास्त प्रथिने असतात. तसेच ९ अत्यावश्यक अमिनो अ‍ॅसिड्स असतात. अंड्यापासून सरासरी ६६ किलो कॅलरीज ऊर्जा मिळते व ती मानवी आहारात लागणाऱ्या सरासरी ऊर्जेच्या तीन टक्के असते. मात्र महाराष्ट्रात अंड्यांचा वापर खूप कमी होतो, असे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.शाळांतील पोषण आहार योजनेत आठवड्यातून किमान तीन दिवस अंडी द्यावीत, तसेच अंगणवाड्यांतील मुले व गर्भवती मातांनाही अंडी दिली जावीत, असे या विभागाचे म्हणणे आहे. कुक्कटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित निर्णयामुळे गावपातळीवरच अंड्यांची बाजारपेठ मिळू शकेल, हा प्रस्तावामागील एक प्रमुख हेतू आहे. अंड्यांत भेसळ करता येत नाही. शिवाय त्यात भरपूर पोषणमूल्ये आहेत. त्यामुळे ही योजना लाभार्थी व शासन दोघांसाठीही लाभकारी ठरू शकते. यावर्षी अंगणवाड्यांत प्रथमच उकडलेली अंडी वाटप करण्यात आली. आठवड्यातून दोन दिवस अंडी दिली गेली. या दोन दिवसांत उपस्थितीत वाढ दिसली, असे विभागाचे म्हणणे आहे. राष्ट्रीय पोषण संस्थेच्या शिफारशींनुसार राज्यात प्रतिमाणसी वर्षाला १८० अंड्यांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात ४३ अंडीच उपलब्ध आहेत. राज्याची अंड्यांची गरज भागविण्यासाठी तमिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पशुसंवर्धन आयुक्तालयातील विस्तार विभागाने अंडी उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजनांवर विचार सुरू केला आहे. ------------शाळा तसेच अंगणवाड्यांत अंडीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनासमोर मांडणार आहोत. कुपोषण कमी करण्यासाठी अंडी खाण्यास चालना देणे तसेच त्यातून रोजगारनिर्मिती करणे, हे उद्देश यामागे आहेत. --------जागतिक अंडी दिनानिमित्त पुणे शहर व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांत एक लाख उकडलेली अंडी वाटप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त विश्वास भोसले यांनी सांगितले.