शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

फसवणाऱ्या बिल्डर्सची मालमत्ता जप्त होणार

By admin | Updated: December 24, 2014 01:05 IST

वेगवेगळ्या हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये आॅफर देत स्वस्तात घर, फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सला आता चाप बसणार आहे. यासाठी विधी व न्याय विभागाचे मत घेऊन

एमपीआयडी कायद्यात करणार सुधारणा : बँक अधिकारी सहआरोपी नागपूर : वेगवेगळ्या हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये आॅफर देत स्वस्तात घर, फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सला आता चाप बसणार आहे. यासाठी विधी व न्याय विभागाचे मत घेऊन एमपीआयडी कायद्यात ( महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इनव्हेस्टर अ‍ॅण्ड डिपॉझिटर्स अ‍ॅक्ट) दुरुस्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या दुरुस्तीमुळे नागरिकांची अशी फसवणूक करणाऱ्या बिल्डरची दुसरीकडे असलेली असलेली मालमत्ता जप्त करून तिची विक्री केली जाईल व येणाऱ्या रकमेतून नागरिकांचे पैसे परत करणे शक्य होईल. याशिवाय बँकेचे अधिकारी बिल्डर्सशी संगनमत करून अपुरी कागदपत्रे असतानाही कर्ज मंजूर करीत असल्याचे आढळून आले तर त्यांनाही अशा प्रकरणात सहआरोपी केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ठाणे, नवी मुंबई यासह मोठ्या शहरांमध्ये मोकळ्या जागेवर गृहनिर्माण प्रकल्पांच्या पाट्या लावून फ्लॅटचे बुकिंग घेण्याचे व नंतर पैसे घेऊन पळ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. हे सर्व प्रकार ले-आऊट व बांधकाम क्षेत्रातील काही सराईत लोक करत आहे का, याची चौकशी करण्यासाठी व असे गुन्हे घडल्यास गुन्हेगारांना त्वरित शोधून काढण्यासाठी एक टास्क फोर्स नेमला जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या संबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. चिपळे भोकरपाडा स्टॉप येथे स्वप्ननगरी होम्स बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे मालक अनिल दामोदर पोटे व श्रीनिवास मुरारी यांनी नवीन प्रकल्पांमध्ये सदनिका देण्याच्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगत या प्रकरणी सरकारने काय कारवाई केली, अशी विचारणा केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. यावर प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांचे पैसे परत करण्यासाठी बिल्डर्सची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली होती. या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली.