संस्थाचालकांवर कारवाईची ग्वाही

By Admin | Updated: March 13, 2015 01:41 IST2015-03-13T01:41:48+5:302015-03-13T01:41:48+5:30

संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सामावून घेण्यात टाळाटाळ करणाऱ्या शाळांचे संस्थाचालक आणि नवीन शिक्षक भरतीस मान्यता देणाऱ्या

Proof of action on institutional operators | संस्थाचालकांवर कारवाईची ग्वाही

संस्थाचालकांवर कारवाईची ग्वाही

मुंबई : संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सामावून घेण्यात टाळाटाळ करणाऱ्या शाळांचे संस्थाचालक आणि नवीन शिक्षक भरतीस मान्यता देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
२०१२-१३ व २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील अतिरिक्त शिक्षकांना नियमित वेतन दिले जात नाही. शिवाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सामावून घेण्यासाठी संबंधित संस्थाचालकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी उपस्थित केला. यावर तावडे यांनी संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले.

Web Title: Proof of action on institutional operators