शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

हत्येच्या तपासातील दिरंगाईचा निषेध

By admin | Updated: August 19, 2016 01:21 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम.एम. कलबुर्गी यांचे

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम.एम. कलबुर्गी यांचे मारेकरीही फरार आहेत. या तपासातील दिरंगाईच्या निषेधार्थ २० आॅगस्ट रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व शाखा जिल्हाधिकारी व तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळी निवेदने पाठवणार आहेत. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ही माहिती दिली.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाई क्लेषदायक आहे. हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता वीरेंद्र तावडे याला अटक होऊनही तपासात अपेक्षित प्रगती झालेली नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणा एन. आय. ए.च्या उदासीनतेमुळे तपासाला वेग आलेला नाही. पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने वीरेंद्र तावडे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नाही. या पार्श्वभूमीवर तपासातील दिरंगाईचा निषेध म्हणून काळी निवेदने पाठवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारवंतांच्या हत्येला कारणीभूत ठरणाऱ्या प्रवृत्तीविषयी ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा अंनिसने व्यक्त केली आहे. हिंसेचे समर्थन करणाऱ्या सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीवर सरकार कारवाई का करत नाही, असा सवालही अंनिसने उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)हिंसा के खिलाफ, मानवता की ओरहिंसेला विरोध करण्यासाठी आणि हिंसक वर्तनाची कारणीमीमांसा करण्याच्या हेतूने अंनिसतर्फे राज्यात ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ हे राष्ट्रीय प्रबोधन अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत ३० जिल्ह्यांत ‘हिंसेला नकार व मानवतेचा स्वीकार’ या विषयावर ‘युवा संकल्प परिषद’ घेण्यात येत आहेत. २० आॅगस्ट रोजी ठिकठिकाणी होणाऱ्या निषेध कार्यक्रमांतून हा संकल्प सामूहिकरीत्या राबवण्यात येणार आहे.