Priyanka Chaturvedi's status on 'odd and Even', viral memes laughing over | महाराष्ट्र निवडणूक 2019 : प्रियंका चतुर्वेदींची अवस्था 'ऑड अँड इव्हन', व्हायरल 'मिम्स'वर हसू आवरेना
महाराष्ट्र निवडणूक 2019 : प्रियंका चतुर्वेदींची अवस्था 'ऑड अँड इव्हन', व्हायरल 'मिम्स'वर हसू आवरेना

मुंबई - राज्यातील सत्ता समीकरणावरुन सर्वच पक्षांच्या नेत्यांची खिल्ली उडविण्यात येत आहे. कोणत्या पक्षाचा नेता, कुठल्या पक्षाशी कसा जोडला जात आहे. तसेच, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचीही कशी दयनीय अवस्था झालीय. आपण ज्या पक्षातून दुसऱ्या पक्षात आलो, तोच पक्ष आपल्या पूर्वीच्या पक्षासोत हातमिळवणी करत आहे. त्यामुळे कोण कुणासोबत आणि कोण-कुणाविरुद्ध हेच सांगता येणं अवघड झालंय. शिवसेनाकाँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येत सरकार स्थापन करेल, असा दावा करण्यात येत आहे. त्यावरुन नेटीझन्सने शिवसेनेच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांची खिल्ली उडवली आहे. 

प्रियंका चतुर्वेदी यांनीच एक लिंक शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रियंका यांच्यी खिल्ली उडविण्यात आल्याचं मिम्स दिसून येतात. त्यामध्ये प्रियंका यांना कुणी काँग्रेसच्या एजंट म्हटलंय, तर कुणी ऑड अँड इव्हनची उपमा दिलीय. एक दिवस काँग्रेससोबत अऩ् एक दिवस शिवसेनेसोबत असं म्हणत त्यांची खिल्ली उडवलीय. तसेच, काँग्रेस आणि शिवसेनेच्या एकत्रिकरणावरुन प्रियंका यांचे अनेक मिम्स बनविण्यात आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, हे मिम्स पाहून मलाही हसू आल्याचं प्रियंका यांनी म्हटलंय. 

 

Web Title: Priyanka Chaturvedi's status on 'odd and Even', viral memes laughing over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.