शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

काटेवाडीत दूध संकलन केंद्रावर छापा

By admin | Updated: September 16, 2014 23:04 IST

बारामती येथील काटेवाडी दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला.

काटेवाडी: बारामती येथील काटेवाडी दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात आढळून आलेल्या पावडर व जप्त केलेल्या रसायन तपासणीच्या अहवालावरून कारवाई करण्यात येणार आहे. 
पुणो येथील अन्न व औषध प्रशासन पथकाच्या सहायक आयुक्तांकडे याबाबत भेसळ होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन अन्न विभागाचे सहायक आयुक्त संजय नारांगुडे व दिलीप संगत यांच्या पथकाने मंगळवारी (दि. 16) काटेवाडी येथील दूध संकलन केंद्रावर सकाळी  छापा टाकला. त्या वेळी संस्थेचे चेअरमन नवनाथ ठोंबरे व कर्मचारी भेसळ करताना आढळून आले. तपासणीत ग्लुकोज पावडर आढळली. या पावडरचा साठा करणो बेकायदेशीर आहे. त्यामुळे पावडरसह इतर साहित्य, रसायने तपासणीकरिता ताब्यात घेण्यात आली, तर भेसळ केलेले हजार लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. 
अन्न सहायक आयुक्त नारांगुडे व संगत आदींसह अन्न सुरक्षा अधिकारी युवराज ढेंबरे, अविनाश दाभाडे, आर. आर. काकडे, आर. बी. कुलकर्णी आदी या पथकामध्ये सहभागी 
झाले होते. 
उशिरार्पयत पथकातील अधिकारी कसून चौकशी करत होते. या पथकाने दूध संकलन केंद्राचे नवनाथ ठोंबरे यांच्या किराणा दुकानाचीसुद्धा तपासणी केली. काटेवाडी परिसरात अनेक दूध संस्थेच्या वतीने हजारो लिटर दूध संकलन करण्यात येते. पथकाने दूध संकलन करून रिकामे दुधाचे कॅन घेऊन निघालेल्या अंथुण्रे (ता. इंदापूर) येथील मधुकर धापटे याचे चारचाकी वाहन थांबवून माहिती घेतली. त्यामुळे परिसरातील अनेक दूध संकलन संस्थांचे धाबे दणाणलेले आहेत. मागील चार महिन्यांपूर्वी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे छापा टाकण्यात आला होता. तीच परिस्थिती काटेवाडीतील या दूध संकलन केंद्रात आढळून आली. तपासणी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न सहायक आयुक्त नारागुडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)
 
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील काही वर्षापूर्वी उघडकीस आलेले दूध भेसळ प्रकरण खूप गाजले होते. येथील युवा दुकानदार या  प्रकरणातील प्रमुख सूत्रधार होता. बारामती, फलटण आदी भागांत तो भेसळीचे सामान पुरवीत असल्याचे उघडकीस आले होते. फलटणचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिका:यांनी ही कारवाई केली होती. या पाश्र्वभूमीवर काटेवाडीतील या छाप्याची परिसरात दिवसभर चर्चा होती.