शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे अध्यक्षपदास महानोर यांचा नकार

By admin | Updated: June 7, 2015 02:17 IST

राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळी परिस्थित्ी असल्याने विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास

पुणे : राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळी परिस्थित्ी असल्याने विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास कवी ना़धों़ महानोर यांनी असमर्थता दर्शविली आहे़ यासंदर्भातील पत्र गतवर्षी डिसेंबरमध्येच साहित्य महामंडळाला दिल्याचे महानोर यांनी सांगितले़ मात्र, त्या पत्राला उत्तर देण्याचे सौजन्यही अद्याप महामंडळाने न दाखविल्याने महानोरांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी टोरँंटो (कॅनडा) येथील मराठी मंडळाच्या निमंत्रणामुळे विश्व साहित्य संमेलनाचा मुहूर्त जुळून आला. त्याचवेळी अध्यक्षपदी महानोर यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु आयोजकांनी खर्च करण्यास नकार दिल्याने हे संमेलनच रद्द करावे लागले. त्यामुळे शासनाकडून मिळालेले २५ लाख रूपये परत करण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली. ते संमेलनच न झाल्यामुळे महानोरांना अध्यक्षपदाची संधीच मिळू शकली नाही. त्यानंतर एका वर्षाच्या विलंबाने दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग शहरातील मराठी मंडळाकडून आयोजनाचा प्रस्ताव आल्याने महामंडळाच्या आशा पल्लवित झाल्या. नऊ महिन्यांपूर्वी महामंडळाने जोहान्सबर्गचे अध्यक्षपद स्वीकारावे असे पत्र महानोरांना पाठविले. विश्व संमेलन अंदमानला घेण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसंघ विकास मंचाचा प्रस्ताव ४ वर्षांपासून साहित्य महामंडळाकडे पडून आहे. त्या प्रस्तावाला दरवर्षी बगल देत विदेशातच संमेलनाची पताका फडकविण्यात महामंडळाने धन्यता मानली. आता कुणीच वाली न राहिल्यामुळे महामंडळाकडूनच संमेलनासंबंधी विचारणा झाल्याने आयोजकांनी, पदाधिकाऱ्यांबरोबर रसिकांचा देखील २ दिवसाचा खर्च करावा लागेल, अशी अट ठेवून महामंडळालाच पेचात टाकले आहे.