शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

एमयूटीपी-३मधील सात प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे सादर

By admin | Updated: February 24, 2015 04:27 IST

उपनगरीय रेल्वेमार्गावर येत्या काळात एमयूटीपी-३ अंतर्गत आणखी काही मोठे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी यातील सात प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे सादर केले

सुशांत मोरे, मुंबईउपनगरीय रेल्वेमार्गावर येत्या काळात एमयूटीपी-३ अंतर्गत आणखी काही मोठे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी यातील सात प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे सादर केले असून, रेल्वे अर्थसंकल्पात त्यांना मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांना आहे. या सात प्रकल्पांची एकूण किंमत ११ हजार ४४१ कोटी रुपये एवढी आहे. एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आता एमयूटीपी-२ अंतर्गत अनेक प्रकल्पांचे काम केले जात आहे. यातील विविध प्रकल्प लवकरच मार्गी लावून एमयूटीपी-३ अंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यावर विचार केला जात आहे. त्यासाठी एमयूटीपी-३मधील सात प्रकल्प एमआरव्हीसीकडून नुकतेच रेल्वे बोर्डाकडे सादर केले असून, यात पनवेल-कर्जत दुहेरीकरण, ऐरोली-कळवा लिंक रोड, विरार ते डहाणू तिसरा आणि चौथा मार्ग यांसह स्थानकांचा विकास, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील दोन स्थानकांमधील रूळ ओलांडणे रोखण्यासाठी विविध योजना आणि तांत्रिक कामे तसेच नवीन डबे आणि लोकलची खरेदी अशा प्रकल्पांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एमयूटीपी-३मधील विरार-वसई-दिवा-पनवेल नवीन मार्ग, हार्बरवरील गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत विस्तार, बोरीवली ते विरार पाचवा आणि सहावा मार्ग, कल्याण ते कसारा तिसरा आणि चौथा मार्ग, कल्याण ते कर्जत तिसरा आणि चौथा मार्ग या प्रकल्पांबाबत मात्र काही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याऐवजी अन्य सात प्रकल्पांवरच विचार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.