शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये यंदाचे बारावे विद्रोही साहित्य संमेलन

By admin | Updated: November 3, 2014 23:26 IST

भरगच्च कार्यक्रम : दोन दिवसीय सोहळ्यात परिसंवाद, चर्चासत्रे

सातारा : यंदाचे बारावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन बीड येथे शनिवार, दि. १३ व रविवार, दि. १४ डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित केल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव व स्वागताध्यक्ष अ‍ॅड. हनुमंत उपरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.बीड येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सत्यशोधक ओबीसी संघटनेच अध्यक्ष अ‍ॅड. हनुमंत उपरे तसेच संयोजन समितीच्या अध्यक्षपदी कॉ. नामदेव चव्हाण यांची निवड झाल्याची माहिती कॉ. धनाजी गुरव यांनी दिली. गुरव म्हणाले, ‘महात्मा फुले यांनी ग्रंथकार सभेस जे पत्र दिले त्या पत्राच्या मजकुरास अनुसरूनच आम्ही विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करत आहोत. तथाकथित साहित्य चळवळीला पर्याय देण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. बीड येथे विद्रोही साहित्य संमेलन घेण्यामागे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करणे, हा हेतू आहे. बीड येथून क्रांतिसिंह नाना पाटील यांना लोकसभेवर जनतेने निवडून पाठविले होते. हा ऋणानुबंध कायम राहावा व क्रांतिसिंहांचे विषमतेवर आधारित समाजव्यवस्था बदलण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम विद्रोहीच्या वतीने केले जाते. ते पुढे नेण्यासाठी बीडमध्ये संमेलन आयोजित केल्याचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. हनुमंत उपरे यांनी सांगितले. बीड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या नगरीत संमेलन होणार आहे. यावेळी विद्रोहीचे राहुल गंगावणे, पूजा दळे, सागर अडागळे, अश्विन दळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)असे होणार कार्यक्रमसाहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चासत्रे, कविसंमेलन, शाहिरी व आदिवासी लोककलांचा उत्सव होणार आहे.सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत मैलाचा दगड ठरणार असल्याचे उपाध्यक्ष विजय मांडके यांनी सांगितले.