शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर येथे शासकीय यंत्रणेची सज्जता

By admin | Updated: August 4, 2016 21:21 IST

येथे श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे चार ते पाच लाख भाविक येथे येत असतात. यासाठी नियोजन करण्यासाठी नगरपालिका सभागृहात

ऑनलाइन लोकमतत्र्यंबकेश्वर, दि. ४ : येथे श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे चार ते पाच लाख भाविक येथे येत असतात. यासाठी नियोजन करण्यासाठी नगरपालिका सभागृहात एका खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजया लढ्ढा होत्या.

त्र्यंबकेश्वर येथे चारही सोमवारांबरोबरच संपूर्ण महिनाभर भाविकांचा ओघ राहणार असल्याने भाविक एसटी बस, खासगी वाहने अन्य प्रवासी बस आदिंचा वापर करून श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकला येत असतात. या गर्दीमुळे पोलीस यंत्रणेवर वाहनांचे नियोजन, कायदा आणि सुव्यवस्था राखणे आदि कामांसाठी सर्वात जास्त ताण येतो. हे सर्व करण्यासाठी जादा पोलीस बळ असावे लागते. सर्व खासगी वाहने खंबाळे, अंबोली, पहिने व तळवाडे वाहनतळावर थांबविण्यात येतील व तेथून बसने शहरात स्वतंत्रपणे एस.टी. बसने येता येईल.

गावात कुठलेही वाहन आणता येणार नाही, मात्र एसटी बस शहरात येतील हे नियोजन फक्त श्रावण सोमवारी असेल. बाकी जशी गर्दी वाढेल तसे नियोजन असेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. परिक्रमा फेरी मार्गावरदेखील पुरेसा बंदोबस्त असेल. त्यामुळे केवळ हौसेखातर व फेरीच्या नावाखाली येणारे, नशिले, मादक पदार्थ सेवन करून ‘पिकनिक’साठी व छेडछाड करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची आरोग्य व्यवस्था ग्रामीण रुग्णालयातर्फे घेण्यात येईल. पहिला, दुसरा आणि चौथ्या सोमवारी रुग्णालयात असलेल्या नियमित तीन वैद्यकीय अधिकारी-१, वैद्यकीय अधीक्षक-१ व अन्य कर्मचाऱ्यांमार्फत व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध असेल तर तिसऱ्या सोमवारी मात्र चार ठिकाणी फिरते आरोग्य पथक तैनात करण्यात येईल. या शिवाय पाणीपुरवठा सुरळीतपणे होईल. त्र्यंबक नगरपालिका व मजीप्रातर्फे थोडा क्लोरिनचा डोस वाढविण्यात येईल. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून श्रावण सोमवार यशस्वीपणे पार पाडावेत, असे आवाहन नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी केले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने कुशावर्त तीर्थावर जवळपास २५ जीवरक्षक असणार आहेत. त्यामुळे कुशावर्तावर सहसा बुडण्याचा धोका राहणार नाही. तरीदेखील भाविकांनी दोरीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. येत्या ११ आॅगस्टला सिंहस्थ पर्वकाल संपणार असल्याने पहिल्या सोमवारी, मंगळवारी व बुधवारी कदाचित भाविकांची सिंहस्थ स्नानासाठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. प्रशासनाने मात्र श्रावण नियोजनाची पूर्णपणे जय्यत तयारी केली आहे. यावेळी नगरसेवक, अधिकारी वर्ग उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर मंदिर, जव्हार फाट्यावरील बसस्थानक, सापगाव फाटा (जेथून फेरीचा परतीचा मार्ग आहे) व कुशावर्त तीर्थ या ठिकाणी फिरते आरोग्य पथक असेल. १०८ रुग्णवाहिका येथील दोन रुग्णवाहिकेसह नऊ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे त्यामुळे कोणतीच गैरसोय होणार नाही. जादा वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पुरेसा औषधसाठा, रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्याची व्यवस्था असेल, अशी माहिती डॉ. भागवत लोंढे यांनी दिली. त्र्यंबक पालिका गावातील स्वच्छता, पथदीप, पुरेसे पाणी आदि जबाबदारी पार पाडणार आहे. अधिकारी आदि फिरणार असल्याने भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही.एस.टी. महामंडळातर्फे तिसऱ्या सोमवारव्यतिरिक्त नेहमीच्या टायमिंग १५० गाड्यांव्यतिरिक्त ५० जादा बसेस रविवार, सोमवार या दोन दिवसांत सोडण्यात येतील. तात्पुरत्या स्वरूपात जव्हार फाट्यावरील बसस्थानक सुरू करून तेथूनच गाड्यांचे नियोजन केले जाईल, अशी माहिती शरद झोले यांनी दिली. ते म्हणाले, भाविकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, पुरेशा बसेस उपलब्ध आहेत.पोलिसांची अधिक कुमकत्र्यंबक पोलिसांनी केलेल्या नियोजनासाठी वरिष्ठांकडे पहिला, दुसरा आणि चौथ्या सोमवारी एक पोलीस उपअधीक्षक, १२ पोलीस निरीक्षक, २४ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ३००- पोलीस कर्मचारी, ७५ महिला पोलीस कर्मचारी, २०० पोलीस कर्मचारी, तर तिसऱ्या श्रावण सोमवारी चार पोलीस उपअधीक्षक, १६ पोलीस निरीक्षक, ६४ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ७०० पोलीस कर्मचारी, त्यात महिला पोलीस कर्मचारीदेखील असतील व ३०० होमगार्ड्सची मागणी केली आहे.