प्रीती पांडेच्या खुन्याला नागपुरात अटक

By Admin | Updated: March 9, 2015 01:33 IST2015-03-09T01:33:39+5:302015-03-09T01:33:39+5:30

प्रेयसीची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला तब्बल ४७ दिवसांनंतर पोलिसांनी रविवारी नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करून वर्धेत आणले.

Preeti Pandey's murderer arrested in Nagpur | प्रीती पांडेच्या खुन्याला नागपुरात अटक

प्रीती पांडेच्या खुन्याला नागपुरात अटक

वर्धा : प्रेयसीची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला तब्बल ४७ दिवसांनंतर पोलिसांनी रविवारी नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करून वर्धेत आणले. वर्धेतील हॉटेल गुलशनमध्ये १८ जानेवारी रोजी नागपूरच्या प्रीती पांडे या युवतीची हत्या झाली होती. तिचा प्रियकर रूपेश तिडके हा हत्या करून फरार झाला होता.
दरम्यान, प्रीतीचे दुसऱ्यासोबत सूत जुळल्याने तिला संपविल्याची कबुली रूपेशने वर्धा पोलिसांना दिली आहे़
आठ वर्षांपासून प्रीती व रूपेश यांच्यात प्रेमसंबंध होते. प्रीतीला दिल्ली येथे नोकरी लागली. त्यादरम्यान तिचे विष्णू, धीरज व रवी या तिघांसोबतही सूत जुळल्याची माहिती रूपेशला मिळाली. जानेवारीत प्रीती नागपूर येथे आली असता त्याने तिला वर्धेला आणले. वर्धेत दोघेही गुलशन हॉटेलात थांबले होते. यावेळी त्यांच्यात दिल्लीतील प्रकरणावरून चर्चा झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्या माहितीनुसार तिने दिल्ली येथील तिघांशी संबंध ठेवल्याचे कबूल केले होते. यावरून वाद होऊन रूपेशने तिच्या तोंडावर उशी दाबून तिला संपविल्याचे कबूल केले. वैद्यकीय तपासणी करून त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Preeti Pandey's murderer arrested in Nagpur