महाड - किल्ले रायगडावरील श्रद्धेचे ठिकाण असलेल्या शिवसमाधीस्थळी एका जोडप्याने ‘ प्री- वेडिंग शूटिंग’ केले. हे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे फलोद्यानमंत्री भरत गोगावले यांनीही घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत असे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा दिला.
सोशल मीडियावरही या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेक शिवप्रेमींनी गड-किल्ल्यांच्या पावित्र्याचा अवमान होत असल्याची भावना व्यक्त केली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आखून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी अपेक्षा इतिहासप्रेमी व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. लग्नासारख्या शुभकार्याच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी निमंत्रण अर्पण करणे किंवा आशीर्वाद घेणे ही परंपरा स्वागतार्ह आहे. मात्र, ‘प्री-वेडिंग शूटिंग’सारखे प्रकार अयोग्य आहे. गडांवर अशा प्रकारचे कृत्य करताना कोणी आढळल्यास शिवभक्त त्यांचा योग्य तो समाचार घेतील, असे परखड मतही मंत्री गोगावले यांनी व्यक्त केले. घटनास्थळी उपस्थित पोलिस गार्ड आणि सिक्युरिटी गार्ड यांच्यावरही जबाबदारी निश्चित करत त्यांच्या बदलीची कारवाई केली जाईल, असे त्यांनी संकेत दिले आहेत.
Web Summary : A pre-wedding shoot at Raigad Fort's Shivaji Samadhi site has angered Shiv devotees. Minister Gogawale condemned the act, warning against disrespect. Stricter guidelines and accountability for security are demanded.
Web Summary : रायगढ़ किले के शिवाजी समाधि स्थल पर प्री-वेडिंग शूट से शिव भक्त नाराज हैं। मंत्री गोगावले ने इस कृत्य की निंदा की और अनादर के खिलाफ चेतावनी दी। सख्त दिशानिर्देशों और सुरक्षा जवाबदेही की मांग की गई है।