पूर्व प्राथमिक प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच

By Admin | Updated: December 29, 2014 05:54 IST2014-12-29T05:54:38+5:302014-12-29T05:54:38+5:30

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Pre-primary Admission Schedule soon | पूर्व प्राथमिक प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच

पूर्व प्राथमिक प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच

मुंबई : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी खासगी शाळांनी शिक्षण विभागाच्या प्रवेशाच्या वेळापत्रकापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शाळांचा हा राखीव जागा लाटण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. असे असतानाही शाळांनी हे नियम धाब्यावर बसविल्याने या प्रवेशांचा बोजवारा उडाला होता; तर अनेक नामांकित शाळांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला होता. गेल्या काही वर्षांत झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून मुंबई आणि पुणे येथे राबविण्यात येत असलेल्या या प्रवेशासाठीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
मुंबई महानगरपालिका हद्दीतील खासगी शाळांतील राखीव जागांची माहिती यंदा नव्याने मागविण्यात आली आहे. ज्या शाळांनी गेल्या वर्षी राखीव जागा भरण्यास टाळाटाळ केली होती, अशा शाळांवर शिक्षण विभागाचे अधिक लक्ष असणार
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pre-primary Admission Schedule soon