शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शनाचा शो!

By admin | Updated: September 27, 2014 05:35 IST

उमेदवारी अर्ज भरण्यास शनिवारचा अखेरचा दिवस शिल्लक असल्याने आज प्रत्येक निवडणूक कार्यालयात गोंधळाचे वातावरण असेल

मुुंबई : उमेदवारी अर्ज भरण्यास शनिवारचा अखेरचा दिवस शिल्लक असल्याने आज प्रत्येक निवडणूक कार्यालयात गोंधळाचे वातावरण असेल. महायुती आणि आघाडीच्या घटस्फोटानंतर प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर ठाकल्यास राडे होण्याची शक्यता आहे. फाटाफूट झाल्याने आपल्या पक्षातून कोणाला उमेदवारी द्यायची हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांना रात्री उशिरापर्यंत सोडविता आलेला नाही. त्यामुळे आजपर्यंत या प्रमुख पक्षांपैकी थोडेथोडकेच उमेदवार अर्ज भरून मोकळे झालेत. रात्री उशीरा प्रमुख पक्षांनी याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच अर्ज भरण्यास उमेदवारांची निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी होऊ शकेल.फाटाफूट झाल्याने शत्रुत्वाच्या भावनेतून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, मारामारी होण्याची शक्यता अधिक आहे. फाटाफुटीनंतरच्या नव्या समीकरणांमुळे पूर्व उपनगरात भांडुप, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व हे तीन मतदारसंघ राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनले आहेत. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे संभाव्य उमेदवार राम कदम उद्या अर्ज भरतील. त्यासोबत शिवसेनेचा संभाव्य उमेदवारही अर्ज दाखल करेल. मनसेतून भाजपामध्ये आलेल्या कदम यांना शिवसेनेचा प्रखर विरोध आहे. या दोघांचे कार्यकर्ते समोरासमोर ठाकल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल. त्याचप्रमाणे घाटकोपर पूर्वेकडील निवडणूक कार्यालयात भाजपाचे प्रकाश मेहता, काँग्रेसचे प्रवीण छेडा, शिवसेना व राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांसह येतील. यापैकी छेडा, मेहता यांच्यातील स्पर्धा, राजकीय तणाव सर्वश्रुत आहे. भांडुपमध्ये मनसेच्या शिशिर शिंदेंव्यतिरिक्त प्रमुख पक्षांपैकी कोणीच अर्ज भरलेला नाही. त्यामुळे उद्या चारही पक्षांचे उमेदवार निवडणूक कार्यालयाजवळ शक्तिप्रदर्शन करतील. अशीच परिस्थिती शहरातील अन्य निवडणूक कार्यालयांमध्येही असेल. (प्रतिनिधी)