शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

By admin | Updated: June 19, 2015 22:53 IST

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल

मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.मुंबई विद्यापीठाच्या एमए आॅनर्सचा पब्लिक पॉलिसी, एमएचा इंटरनॅशनल अ‍ॅन्ड ग्लोबल अफेर्स, बीए पाचव्या सत्राचा इस्लामिक स्टडी या विषयांचे पेपर आणि एमएससीच्या वेगवेगळ््या विषयांच्या प्रॅक्टिकल परीक्षा शुक्रवारी पार पडणे अपेक्षित होते. मात्र मुसळधार पावसामुळे ठप्प पडलेल्या मुंबईत परीक्षार्थींना केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याचे भोंडे यांनी सांगितले.दरम्यान, पीएचडीच्या परीक्षेसाठी गुजरातहून एक परीक्षार्थी विमानाने मुंबईत आला होता. मात्र नियोजित वेळेत फोर्टपर्यंत पोहोचणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे तत्काळ त्याच्या केंद्रात बदल करून कलिना विद्यापीठात त्याची परीक्षा घेण्यात आली.आज शाळा, कॉलेज बंदहवामान खात्याने शनिवारीही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शिक्षण विभागाने मुंबईतील सर्व शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शनिवारी शाळा आणि कॉलेजमध्ये न जाण्याचे आवाहन केले आहे.