Postpon all exams this month maharashtra minister Jitendra Awhad demand to the Chief Minister coronavirus | Coronavirus : या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला; जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Coronavirus : या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला; जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी केली मागणीराज्यात सध्या लावण्यात आले आहेत कडक निर्बंध.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोना महासाथीचा प्रादुर्भव सुरू झाला होता तेव्हापेक्षाही अधिक रुग्णांची नोंद दररोज आहे. दरम्यान अनेक क्षेत्रांवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसंच शिक्षण क्षेत्रालाही या मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून अनेकांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. दरम्यान, यामध्ये एमपीएससीच्या उमेदवारांचाही समावेश आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे.

“सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटसोबत MPSC आणि MHUEXAM असा हॅशटॅगही वापरला आहे.१ ली ते ८ वीचे विद्यार्थी सरसकट उत्तीर्ण

विद्यार्थ्यांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठीही आपण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक मूल्यमापन संदर्भात महत्वाचा निर्णय घेत असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. तसंच देशातील मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत (RTE) या विद्यार्थ्यांचं वार्षिक मूल्यमापन करणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा ते शक्य नाही. त्यामुळेच, पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Postpon all exams this month maharashtra minister Jitendra Awhad demand to the Chief Minister coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.