शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल

By admin | Updated: July 10, 2014 23:17 IST

अर्थ संकल्पाचे शिक्षण क्षेत्रतून स्वागत केले जात आहे.

पुणो: अर्थ संकल्पाचे शिक्षण क्षेत्रतून स्वागत केले जात आहे. रोजगार वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले शिक्षण मिळावे यादृष्टीने अर्थ संकल्पात तरतुद करण्यात आली आहे.त्यामुळे येणा:या काळात शालेय व उच्च शिक्षणात बदल झालेला दिसून येईल, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रतील तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यक्त केल्या जात आहेत.
 
शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास काही तरतुदी निश्चितपणो चांगल्या आहेत. आयआयटी, आयआयएम्सची स्थापना करण्यासाठी घेतलेला पुढाकार चांगला आहे. शिक्षणासाठी केलेल्या इतर तरतुदीही स्वागतार्ह आहेत.  एकूण अर्थसंकल्पाचा विचार केल्यास  सर्वसामान्य माणसाची काही प्रमाणात निराशा झालेली आहे.  - डॉ. रवी चिटणीस, प्राचार्य
 
अर्थसंकल्पातून उद्योगांना प्रोत्साहन दिण्याचा प्रयत्न झाला आहे.परिणामी रोजगार वाढणार आहेत. अर्थ संकल्पात बगुतांश सर्वच विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राला आयआयएम संस्था मिळाली आहे.ती पुण्यातच स्थापन केली होईल, अशी आशा आहे.
- डॉ.अरुण निगवेकर, माजी अध्यक्ष,युजीसी
 
शिक्षण क्षेत्रसाठी काही उपाययोजना चांगल्या केलेल्या आहेत. गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने आयआयटी व आयआयएम्सची स्थापना करण्याचे पाऊल नक्कीच चांगले आहे. कृषी विकासासाठी केलेली तरतूदही चांगली आहे. शिक्षण क्षेत्रसाठीचे प्राधान्य उल्लेखनीय.  
- डॉ. शिवाजीराव कदम, 
कुलगुरू, भारती विद्यापीठ 
 
महाराष्ट्रात ज्या ठिकाणी व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या चांगल्या संस्था नाही.कौशल्य विकासासाठी केवळ आयटीआय संस्था उपयुक्त नाही,तर विद्यापीठ व महाविद्यालये सुरू करणो गरजेचे आहे.अर्थसंकल्पात ब:याचशा घटकांचा विचार करण्यात आला आहे.  
- डॉ.शां.ब.मुजुमदार, संस्थापक, अध्यक्ष,सिंबायोसिस 
 
 प्राथमिक शिक्षणाचा विचार करता हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे. परंतु, आयआयएम, आयआयटी या सारख्या संस्थांची नव्याने स्थापना करण्यापूर्वी सध्या अस्तित्त्वात असलेल्या या संस्थांच्या अडचणी समजून घेवून त्या सोडविण्यासाठी प्रथमत: भर देणो गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रतील संस्थांची गुणवत्ता कमी होऊ नये. 
- डॉ.वासुदेव गाडे , कुलगुरू ,पुणो विद्यापीठ 
 
उद्योग क्षेत्रंना कर शुल्कात सवलती दिल्याने रोजगार वाढीसाठी मदत होणार आहे. शिक्षण हा विकासाचा पाया असल्याने शिक्षण क्षेत्रत भरीव तरतुद करण्यात आली आहे.करामध्ये सामान्य नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला .शिक्षण,उद्योग आदी क्षेत्रतील थेट परकिय गुंतवणुक वाढणार आहे.
- डॉ.प्र.चिं.शेजवलकर, व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ
 
हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि उद्योग, व्यापार व्यवसायाला चालना देणारा आहे. यात सहकारी बॅँकांना अनेक वर्षापासून लागू असलेल्या प्राप्तिकरामध्ये कोणतीही सवलत दिलेली नसून सहकारी बॅँकांच्या विकासाच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना दिसत नाही.  उद्योगाला चालना मिळणार असल्याने रोजगार निर्मिती होईल. भविष्याचा विचार करून काही भरीव अशा आर्थिक तरतूदी लागू केल्या आहेत.   
- कृष्णकुमार गोयल ,
अध्यक्ष, कॉसमॉस बॅँक
 
अर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प देशाला प्रगतीकडे नेणारा आहे. अर्थसंकल्पातील तरतूदींमुळे पायाभूत सुविधांना चालना मिळेल. गृहनिर्माण मंडळा 1 हजार कोटी रुपये लो कॉस्ट हौसिंगसाठी देण्याचा निर्णय चांगला आहे. गृहकजावर दोन लाखांर्पयतचे व्याज करमुक्त करण्यात येणार असल्याने त्याचा उपयोग होणार आहे. पुण्यात जैवतंत्रज्ञान क्लस्टर निर्माण करण्यात येणार असल्याचे विकासाला गती मिळणार आहे.
- भारत देसडला, 
बांधकाम व्यावसायिक
 
अर्थसंकल्पामुळे व्यापारी आणि नोकरदार वर्गाचा फायदा होणार आहे. अर्थसंकल्पाचा परिणाम आत्ता जाणवला नाही, तरी दोन-तीन वर्षानंतर जाणवेल. सव्र्हिस टॅक्स नसला तरी इतर अनेक सवलती दिल्या आहेत. त्यामुळे व्यापा-यांना फायदा होणार आहे. कराची मर्यादा काही प्रमाणात वाढवली असून यामुळे नोकरदार वर्गाला फायदा होईल.
- श्रीकृष्ण दिक्षीत, 
अध्यक्ष, वेस्टर्न महाराष्ट्र 
टॅक्स असोसिएशन
 
अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. आयकर तरतूद केल्यामुळे गृह वजावटीची मर्यादा दीड लाख होती, ती दोन लाखांर्पयत नेण्यात आली आहे. मागील काही वर्षात रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कायद्यात तरतूदी करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षात रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील तरतूदी उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प सकारात्मक असून फायदा होईल.
- मिलींद भोंडे, उपाध्यक्ष, 
वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स असोसिएशन
 
शहरात क्षयरोग झपाटयाने बळावत आहे. त्याच्याविरूध्द लढण्यासाठी टिबी उपचारासाठी देशात दोन नवी मोठी केंद्रे उभारण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. क्षयरोगींना मदतीची गरज असताना हा निर्णय घेतल्याने त्यांना महागडी औषधे स्वस्तात मिळतील. चांगली शासकीय रुग्णालये उभारणो ही आवश्यकता आहे. चांगले शिक्षण देण्यासाठी नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय चांगला आहे. 
- डॉ. ह. वि. सरदेसाई, 
ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ
 
केंद्र सरकारने आरोग्य सेवा सुधारण्यासाठी नवी सरकारी रुग्णालये उभारण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. पण तो पूर्णपणो शासकीय स्तरावर व्हावा. यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) नको. त्यामुळे आरोग्य सेवा महाग होईल. स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणो आवश्यक आहे. अशुध्द पाण्यामुळेच जलजन्य आजार होतात. स्वच्छ पाण्याचा पुरवठा झाला तर हे आजार कमी होतील, आरोग्य सुधारेल.  
- डॉ. सुहास कोल्हेकर, 
जनआरोग्य अभियान
 
देशाच्या आर्थिक स्थितीला बळकटी देणारा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये सर्व समवेशक घटकांना सामावून घेतले आहे. त्यामुळे सर्वजण आनंदी आहेत. परदेशी गुंतवणुकदारांना प्रोत्साहन दिल्यामुळे व आपल्या देशात गुंतवणूक झाल्याने अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळणार आहे. परिणामी देशातील पैसा वाढणार आहे. आर्थिक तुट कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आलेली आहे. एकूणच सर्वाचा उत्साह वाढेल असा अर्थसंकल्प आज सादर झाला आहे. 
- पीनल वानखेडे, उद्योजिका,
 
महिलांची सुरक्षितता, सबलीकरण व शैक्षणिकदृष्टय़ा उचललेली पावले  स्वागतार्ह आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय गृह मंत्रलयाने महिलांसाठी मोठय़ा शहरात केलेली तरतूद यासोबतच महिला व मुलींसाठीच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार अधिक व्हावा यासाठी मुली वाचवा, मुली शिकवा ही योजना व मुलींच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी छोटय़ा गुंतवणूक सर्टिफिकेटची ही योजना आनंददायी आहे. 
-उषा काकडे, उपाध्यक्ष निपसीसीड