Pooja Chavan Death Case: "उद्धवजी, संजय राठोडांची हकालपट्टी करा; ही घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 12:53 IST2021-02-25T12:53:20+5:302021-02-25T12:53:50+5:30
Pooja Chavan Death Case: संजय राठोड यांच्या बचावासाठी तिन्ही पक्ष एकत्र काम करत असल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप

Pooja Chavan Death Case: "उद्धवजी, संजय राठोडांची हकालपट्टी करा; ही घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको"
पुणे: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod), पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. राठोड यांच्या बचावासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. संपूर्ण पोलीस यंत्रणा दावणीला बांधली गेली आहे. बलात्कारांना वाचवणाऱ्यांचं काम सरकारकडून सुरू आहे, असे आरोप वाघ यांनी केले आहेत. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
संजय राठोड-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजप नेत्याचा टोला, म्हणाले, "बहुदा त्यांना कानात सांगितलं असावं मी तुला..."
चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण राहत असलेल्या वानवडीतील घराची पाहणी केली. त्यानंतर त्या वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. यावेळी पोलिसांनी उद्धट उत्तर दिल्याचं वाघ यांनी सांगितलं. 'अतिशय गंभीर आरोप असलेल्या मंत्र्याला वाचवण्यासाठी तिन्ही पक्ष आणि पोलीस एकत्र काम करत आहेत. पोलिसांवर खूप मोठा दबाव आहे. त्यामुळेच पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून व्यवस्थित केला जात नाही,' असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी काढून घेण्यात यावा आणि त्याची जबाबदारी सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे देण्यात यावी, अशी मागणी वाघ यांनी केला.
"जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत"
शिवशाही केवळ भाषणात नको, कामातून दाखवा, असं आवाहन वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केलं. 'बाकी कोणाकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आम्हाला अपेक्षा आहेत. कारण ते संवेदनशीलपणे आहेत. त्यामुळे त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा. अशी घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको,' असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद; तपास त्यांच्याकडून काढून एका सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी #PoojaChavanSuicide#sanjayrathodhttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/lhauxwyjbL
— Lokmat (@MiLOKMAT) February 25, 2021
संजय राठोड स्वत:ला वाचवण्यासाठी समाजाचा वापर करत असल्याचा आरोप वाघ यांनी केला. 'एका मंत्र्यावर गंभीर आरोप होतात. तो स्वत:च्या बचावासाठी समाजाला पुढे करतो. समाजाचा वापर करून घेतो. मुख्यमंत्री कोरोना पसरू नये असं आवाहन करत असताना हजारोंची गर्दी जमवतो. पण काहीच कारवाई होत नाही,' याबद्दल वाघ यांनी संताप व्यक्त केला. पोहरादेवीत राठोड यांच्या समर्थकांनी गर्दी केली. तिथल्या महंत कबिरदास यांच्या घरातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. यासाठी जबाबदार कोण, असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.