सोशल मीडियावरून धुळ्यात दगडफेक

By Admin | Updated: June 20, 2014 02:16 IST2014-06-20T02:16:38+5:302014-06-20T02:16:38+5:30

धार्मिक भावना दुखावणारी छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत.

Pollution from social media | सोशल मीडियावरून धुळ्यात दगडफेक

सोशल मीडियावरून धुळ्यात दगडफेक

>दोन बसेस फोडल्या : निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचारी जखमी
धुळे : धार्मिक भावना दुखावणारी छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचे पडसाद धुळे शहरात तीन आठवडय़ांपासून वेगवेगळ्या स्वरुपात उमटत आहेत. त्याचा उद्रेक गुरुवारी रात्री साडेदहा वाजता देवपूर परिसरात झाला. जमावाने दोन बसेसवर तुफान दगडफेक केली. यात पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस जखमी झाले  आहे. याप्रकरणी 16 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. 
सोशल मीडियावर एका धर्मगुरुंचे छायाचित्र अवमानकारक पद्धतीने पोस्ट करण्यात आले आहे. ही माहिती संबंधित धार्मिक गटाला कळल्यावर ते देवपूर परिसरात एकत्र आले. या जमावाने दोन बसेसवर दगडफेक केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. या संतापाच्या उद्रेकाचा अंदाज न आल्याने त्यांना पोलीस वाहन सोडून पळावे लागले. या घटनेत एक पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस तसेच एसटीचा कंडक्टर भटू वाघ जखमी झाला. दोन एटीएमचे नुकसान झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याचवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह चार ते पाच पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. सिंह स्वत: अनियंत्रित जमावात घुसले आणि त्यांनी लाठीमार सुरू केला. त्यापाठोपाठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्याचे पोलीस, दंगलप्रतिबंधक पथक, कमांडो घटनास्थळी पोहचले. त्यांनी स्थिती नियंत्रणासाठी लाठीमार सुरू केला. तसेच  घरात घुसून संशयितांचे धरपकड सत्र सुरू केले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Pollution from social media