शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

दलित तरुणाच्या आत्महत्येचे काँग्रेसकडून राजकारण

By admin | Updated: February 1, 2016 02:56 IST

काँग्रेसला दलितांविषयी अजिबात कळवळा नाही. त्यांनी इतकी वर्षे मते मिळविण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला.

औरंगाबाद : काँग्रेसला दलितांविषयी अजिबात कळवळा नाही. त्यांनी इतकी वर्षे मते मिळविण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला. आताही हैदराबादेत दलित तरुणाच्या आत्महत्येचे त्यांच्याकडून राजकारण केले जात आहे, असा आरोप केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी रविवारी केला.रामविलास पासवान यांच्या प्रमुख उपस्थितीत मुकुंदवाडी, रामनगर येथे भारत विकास कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराचा शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. व्यासपीठावर लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शमीम हवा व अन्य मान्यवर उपस्थित होते. भारत विकास कार्यक्रमांतर्गत केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने १९ महिन्यांत केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.पासवान म्हणाले, दलित समाज आजही मागास आहे; परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहे. दलित समाज आणि बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांना आस्था आहे. ती काँग्रेसला नव्हती. हैदराबादेत दलित तरुणाने आत्महत्या केली म्हणून राहुल गांधी उपोषण करताहेत; पण त्या तरुणाने केलेली आत्महत्या आजही देशात जातीवाद जिवंत असल्याचे दर्शक आहे. इतकी वर्ष काँग्रेसने काय केले? सरकार असताना हैदराबादमध्येच सहा दलित तरुणांनी जातीवादातूनच आत्महत्या केल्या. तेव्हा ते कुठे होते, असा सवालही पासवान यांनी केला. (प्रतिनिधी)