शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकासह दोघांना अटक

By admin | Updated: July 11, 2017 00:00 IST

पोलीस निरीक्षकासह दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जात पडताळणीचे प्रमाणपत्र मिळण्यास शिफारस करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी विभागीय जात पडताळणी कार्यालयाच्या दक्षता पथकाचा पोलीस निरीक्षक राजन माधवराव बेकनाळकर (वय ५६, रा. आर. के. नगर, प्लॉट क्रमांक ३९६, कोल्हापूर) याच्यासह त्याच्या खासगी वाहनावरील चालक दत्तात्रय दगडू दळवी (३६, आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली. येथील जुना बुधगाव रस्त्यावरील समाजकल्याण कार्यालयातजात पडताळणी विभागाच्या दक्षता पथकाचे कार्यालय आहे. याठिकाणी राजन बेकनाळकर याची नियुक्ती आहे. तक्रारदार सांगली परिसरातील आहेत. त्यांना त्यांच्या बहिणीचे जात पडताळणी प्रमाणपत्र काढायचे होते. हे काम बेकनाळकरकडे होते. त्याने प्रमाणपत्र मिळण्यास कोल्हापूरच्या मुख्य कार्यालयात शिफारस करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. ‘मी व माझा सहकारी तुमच्या घरी येतो, पाकीट तयार ठेवा’, असे त्याने सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने १६ एप्रिल २०१७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून याची चौकशी सुरू होती. परंतु प्रत्यक्षात बेकनाळकरने लाचेची रक्कम स्वीकारली नाही; पण त्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. सोमवारी बेकनाळकर व त्याच्या खासगी वाहनावरील चालक दत्तात्रय दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा दोघांनाही अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक परशराम पाटील, निरीक्षक सुनील गिड्डे, हवालदार श्रीपती देशपांडे, सुनील राऊत, सुनील कदम, संजय कुलगुटगी, जितेंद्र काळे, भास्कर भोरे, सचिन कुंभार, चंद्रकांत गायकवाड व दीपक धुमाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.बेकनाळकर यांच्या कोल्हापुरातील घराची झडतीकोल्हापूर : पोलीस निरीक्षक राजन माधवराव बेकनाळकर यांच्या आर. के. नगर येथील घराची लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. त्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलीस निरीक्षक राजन बेकनाळकर हे सांगली जातपडताळणी कार्यालयात कार्यरत आहेत.दीड हजार घेतलेतक्रारीची चौकशी सुरू केल्यानंतर बेकनाळकर व त्याचा चालक दळवी यांनी १६ एप्रिलला तक्रारदाराकडून दीड हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्याची चाहूल लागल्याने त्यांनी उर्वरित रक्कम घेतली नसावी, अशी चर्चा आहे.