शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बेबी प्रकरणाकडे पोलीस दलाचे लक्ष

By admin | Updated: June 1, 2015 05:03 IST

ड्रग माफीया बेबी पाटणकर प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी एकमेकांविरोधात केलेल्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे आजघडीला संपूर्ण पोलीस दलाचे

मुंबई : ड्रग माफीया बेबी पाटणकर प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी एकमेकांविरोधात केलेल्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे आजघडीला संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष कोण खरे, कोण खोटे याकडे लागले आहे. या प्रकरणात अटक झालेल्या अंमलीपदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ निरिक्षक सुहास गोखले यांनी मी लढणार, अशी भुमिका घेतल्याने तर पोलीस दलात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.बेबीने प्रियकर व साथीदार बडतर्फ पोलीस शिपाई धर्मराज काळोखेला पोलिसांच्या तावडीत देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने निलंबीत पोलीस निरिक्षक गौतम गायकवाड, पोलीस शिपाई यशवंत पार्टे यांच्याकरवी गोखलेंना काळोखेची माहिती पुरवली होती. पुढे काळोखेला सातारा पोलिसांनी अटक केली आणि त्यात बेबीचे नाव पुढे आले. फरार असताना बेबीने स्वत: गोखलेंना फोन केले. याच मुद्यावरून गोखले यांनी अमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त नामदेव चव्हाण व अप्पर आयुक्त के. एम.एम. प्रसन्ना यांच्यावर आरोपांची तोफ डागली. दोन्ही वेळेस उपलब्ध माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली होती मात्र वरिष्ठांनी प्रतिक्रीया व्यक्त केली नाहीत. तर वरिष्ठांनी गोखलेंवर आरोप केले आहेत. वडिलांच्या निधनामुळे काळोखे गावी गेल्याचे गोखले यांनी सांगितले. प्रत्यक्षात त्याच्या वडिलांचे निधन होऊन बरेच महिने लोटले होते. बेबीबाबतची माहितीही गोखलेंनी चार दिवसांनंतर दिली.याबाबत गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांना विचारले असता तपासात ज्यांची नावे पुढे येतील त्यांची चौकशी होईल, हाती येणारी माहिती पडताळली जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. अद्याप गोखलेंसह अटक झालेल्या पाच आरोपी पोलिसांची चौकशी सुरू झालेली नाही. चौकशीत व त्यांनंतरच्या पडताळणीत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असेही त्यांनी सांगितले.पोलीस दलातही प्रत्येकाला वरिष्ठ अधिकारी खरे बोलतात की गोखले हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.