शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

काळजाला भिडते सुर्वेची कविता

By admin | Updated: August 20, 2014 00:20 IST

सहजपणाने काळजाला भिडणारी नारायण सुर्वेची कविता आहे. ती सरळ आणि साधी आहे. दु:खितांचे, कष्टितांचे प्रतिनिधित्व करते.

ना. धों. महानोर : नारायण सुव्रे काव्यजागर संमेलन
पिंपरी : सहजपणाने काळजाला भिडणारी नारायण सुर्वेची कविता आहे. ती सरळ आणि साधी आहे. दु:खितांचे, कष्टितांचे प्रतिनिधित्व करते. समाजवाद आणि साम्यवाद त्यातून व्यक्त होतो. अशा मित्रच्या नावाचा पुरस्कार मिळाला, हा माङया दृष्टीने परमोच्च आनंदाचा क्षण आहे, असे भावोद्गार कविवर्य ना. धों. महानोर यांनी चिंचवड येथे काढले.
नारायण सुव्रे साहित्य कला अकादमीच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित नारायण सुव्रे काव्यजागर संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे, माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, चित्रपट दिग्दर्शक नागनाथ मंजुळे, रवींद्र जैन, पुरुषोत्तम सदाफुले, कैलास आवटे, बाजीराव सातपुते, सुव्रे यांची कन्या कल्पना घारे आदी उपस्थित होते. भाई वैद्य यांच्या हस्ते महानोर यांना नारायण सुव्रे स्नेहबंध पुरस्कार, मंजुळे यांना काव्यप्रतिभा पुरस्कार, जैन यांना साहित्ययात्री पुरस्कार, ज्ञानदीप विद्यालयास प्रगतिशील शिक्षण संस्था पुरस्कार देऊन सन्मानित केले.   
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सामान्यांतल्या सामान्य माणसाला आपला वाटणारा कवी म्हणजे सुव्रे होत. कष्टक:यांचे भावविश्व त्यांच्या कवितेत होते. सुव्रे, महानोर, करंदीकर, पाडगावकर यांच्या कविता ऐकून, वाचून आम्ही मोठे झालो. आज लोक वाचत नाहीत, हे वास्तव आहे. अभिव्यक्तीला वाट न मिळाल्याने सामाजिक प्रश्न निर्माण होतात. 
मंजुळे म्हणाले, ‘‘मी कविता लिहितो. पण ती सादर करण्याची भीती वाटते. कवितेसाठी सुव्रे यांच्या नावाचा पुरस्कार मिळणो ही माङया दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. आज सुव्रे आपल्यात नाहीत यावर माझा विश्वासच बसत नाहीत. कारण कवी, कलावंत हा त्याच्या कलाकृतीच्या निमित्ताने सदैव आपल्यासोबत असतो.’’ त्यांनी मित्र, अ आणि ब ही कविता सादर करून दाद घेतली. (प्रतिनिधी)
 
मानसिकता चुकीची
साहित्यिक, कवींच्या मानसिकतेविषयी महानोर आणि कोत्तापल्ले यांनी भाष्य केले. महानोर म्हणाले, ‘‘दुस:यांना प्रतिभावंत म्हणण्याची मानसिकता नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. चांगल्याचे कौतुक करण्याची मानसिकता वाढीला लागायला हवी. पुस्तके वाचण्यापेक्षा माणसे वाचायला हवीत. माणसे वाचणारा, साहित्यावर प्रेम करणारा कवी सुव्रे होते. त्यांचे निस्सीम प्रेम तराजूत मोजणो कठीण आहे.’’ नवकवींबाबत कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘नवकवी व्यासपीठावर यायला लागला की, त्याच्या नरडीला नख कसे लावता येईल, याचा विचार सिनियर करीत असतात. हे चुकीचे आहे. आज सादर झालेल्या कविता खरोखरच चिंतनशील आहेत.’’