शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
6
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
7
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
8
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
9
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
10
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
11
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
12
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
13
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
14
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
15
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
16
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
17
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
18
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
19
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
20
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधानांनी पीएमसी बँक प्रकरणी हस्तक्षेप करावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 02:48 IST

काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी खातेदारांना दिलासा देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मुंबई काँग्रेसने केली आहे.

पीएमसी बँक प्रकरणी मुंबई कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. पीएमसीबाबत राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी. पीएमसी बँकेचे दुसऱ्या मोठ्या बँकेमध्ये विलीनीकरण करावे किंवा ज्या प्रकारे राष्ट्रीयीकृत बँकांना रिव्हायव्हल पॅकेज दिले जाते, त्याप्रमाणे पीएमसी बँकेलाही पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी केली. खातेदारांना दिलासा देण्यासाठी त्वरित पावले उचलून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी काँग्रेसने केली.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात भाई जगताप, चरणसिंग सप्रा, गणेश यादव, झिशान सिद्दीकी आदी नेत्यांचा समावेश होता. याबाबत एकनाथ गायकवाड म्हणाले, आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध घातल्याने १६ लाख खातेधारकांची परवड सुरू झाली आहे.

बँकेत जमा असलेल्या स्वत:च्या पैशांसाठी त्यांना वणवण करावी लागत आहे. ११ खातेदारांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे व लाखो खातेदार दडपणाखाली जगत आहेत. पण अजूनही त्यांना न्याय मिळत नाही. नियमबाह्य पद्धतीने एचडीआयएलसारख्या कंपन्यांना लाखोंचे कर्ज देण्यात आले. याला सर्वस्वी पीएमसी बँकेचे मॅनेजमेंट व आरबीआयचे आॅडिटर्स जबाबदार आहेत. जाणूनबुजून त्यांनी ११ वर्षे या घोटाळ्याकडे दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमीवर आम्ही आज राज्यपालांची भेट घेत उपाययोजना करण्याची मागणी केली.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकNarendra Modiनरेंद्र मोदी