शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

PM Modi in Shirdi: 'घर की बात' करत साईंच्या शिर्डीत मोदींनी फोडला 'मिशन २०१९'चा नारळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 1:25 PM

काँग्रेस सरकारवर टीका करत भाजपा सरकारच्या कामांची यादी मोदींकडून सादर

शिर्डी: आधीच्या सरकारनं 4 वर्षात 25 लाख घरं बांधली होती. त्याच कालावधीत आम्ही 1 कोटी 25 लाख घरं बांधली आहेत. नियत स्वच्छ असल्यावर काम जलद गतीनं होतात, अशा शब्दांमध्ये विरोधकांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन 2019चा नारळ फोडला. आधीचं सरकार सत्तेवर असतं, तर तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हायला अजून 20 वर्षे लागली असती. योजना आधीही होत्या, आताही आहेत. मात्र त्यावेळच्या योजनांची अंमलबजावणी फक्त आणि फक्त मतपेढी डोळ्यासमोर ठेवून केली जायची, अशी टीका मोदींनी केली. शिर्डीत आलेल्या मोदींच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरांची चावी देण्यात आली. यानंतर मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला.पंतप्रधानांनी राज्यातील 29 जिल्ह्यातील पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील घरकुलांचं ई-वितरण केलं. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी सरकारकडून 4 वर्षात करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपा सरकारच्या कामांची तुलनादेखील केली. 'आधीचं सरकार घरासाठी 70 हजार रुपये द्यायचं. आम्ही घरासाठी 1 लाख रुपये देतो. याशिवाय भाजपा सरकारनं दिलेल्या घरांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. आम्ही गेल्या 4 वर्षात सव्वा कोटी घरं उभारली. मागील सरकारच्या कामाचा वेग पाहता इथंपर्यंत पोहोचायला त्यांना आणखी 20 वर्ष लागली असती,' अशी आकडेवारी सांगत पंतप्रधानांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-- राज्यात जलयुक्तमुळे 16 हजार गावं दुष्काळमुक्त आणि 9 हजार दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर- मोदी- दुष्काळ निवारण्याच्या कामात आम्ही राज्य सरकारसोबत- मोदी- देशातील 50 कोटी लोकांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळेल, महिनाभरात एक लाख रुग्णावर शस्त्रक्रिया व उपचार झाले- मोदी-  पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी भगिनींशी संवाद साधून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप आनंद झाला, यातून कामाची प्रेरणा मिळाली- मोदी- 2022 पर्यंत देशातील प्रत्येक बेघर माणसाला घर देण्याचा प्रयत्न, त्यातील अर्धा टप्पा पूर्णत्वास- मोदी- नवरात्र ते दिवाळी नवीन काही घेण्याचा, खरेदीचा मोसम याच मुहूर्तावर महाराष्ट्र मधील गरिबांना घरे देण्याची संधी मिळाली- मोदी- गरीबाच्या कल्याणासाठी शिर्डी निवडल्याबद्दल राज्य शासनाला धन्यवाद- बाबांच्या शिकवणुकीचं संस्थानाकडून अनुकरण- मोदी- साईंची शिकवण समाजाला एकत्र बांधणारी- मोदी- बाबांच्या स्मरणानं गरिबांची सेवा करण्याची प्रेरणा मिळते- मोदी- शिर्डीतील कणाकणात साईबाबा वास करतात- मोदी- मोदींकडून भाषणाची सुरुवात मराठीतून- तुमचं प्रेम हेच माझं सामर्थ्य, त्यातून ऊर्जा मिळते- मोदी 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाshirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिर