शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसाठीच्या स्वतंत्र समितीला पवारांचा विरोध

By admin | Updated: December 19, 2014 04:42 IST

मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे

मुंबई : मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव असल्याच्या आरोप यापूर्वी विरोधी पक्षांनी केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादात उडी घेतली आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सात पानी पत्र पाठवून पवारांनी समिती स्थापण्यास कडाडून विरोध केला आहे. स्वत: मोदी यांनीही अशा समितीचे प्रमुखपद स्वीकारू नये, असे आवाहन केले आहे.मुंबईसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचा प्रकार हा महापालिका आणि राज्य शासनाच्या कारभारात केंद्राचा थेट हस्तक्षेप असल्याचा आरोपही शरद पवार यांनी या पत्रात केला आहे. ७४व्या घटनादुरुस्तीनुसार मुंबई महापालिकेचे काम चालते. तिचे बजेटही देशातील अनेक राज्यांपेक्षा मोठे आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. देशाच्या संघराज्य प्रणाली धक्का देण्याचा हा प्रकार असून पंतप्रधानांनी या समितीचे अध्यक्षपद स्वीकारू नये, असे आवाहनही पवारांनी पत्राद्वारे केले आहे. हा निर्णय घेताना मंत्रिमंडळ, मुंबई महापालिकेला आणि तेथे सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही विश्वासात घेण्यात आले नाही, असा दावा पवारांनी केला आहे. ही समिती म्हणजे राज्यात विचारवंत, योजनाकर्ते आणि दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यांची कमतरता असल्याचे द्योतक असल्याचा टोलाही पवारांनी लगावला आहे. (प्रतिनिधी)